Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता Kshitish Date ची  हिंदी

‘पाठक बाई’ देणार गुड न्यूज? Akshaya Deodhar च्या व्हिडिओवरुन प्रेग्नंसीच्या

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi मधून स्मृती इराणींचं कमबॅक; एका

‘लपंडाव’ मालिकेतून Rupali Bhosale चा दमदार कमबॅक; साकरणार महत्वाचे पात्र !

Bazaar Movie : ……करोगो याद तो हर बात याद आयेगी!

Jab We Met : मुसळधार पाऊस आणि रिअल लोकेशन्सवर शुट

Bollywood News : “मी धार्मिक नाही तर…, गायत्री मंत्रामुळे मला…”;मुस्लिम

Gaurav More : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर फिल्टर पाड्याच्या बच्चनची नवी इनिंग

Janhavi Kapoor : मराठी भाषेचा उत्सव साजरा करुया; जान्हवीचा मराठी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Deewaar : “दीवार”चे डायलॉग ऐकायलाही रस्त्यावर गर्दी होई

 Deewaar : “दीवार”चे डायलॉग ऐकायलाही रस्त्यावर गर्दी होई
कलाकृती विशेष

Deewaar : “दीवार”चे डायलॉग ऐकायलाही रस्त्यावर गर्दी होई

by दिलीप ठाकूर 24/01/2025

आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृती अर्थात कल्चर कोणत्याही कॅल्क्युलेटर यात मोजता येणारी नाही. (ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट कृष्ण धवल चित्रपट ते आजपर्यंतच्या काळातील चित्रपट रसिक यावर एखादी वेबसिरीज सहज निर्माण होईल. अहो, पब्लिकने वेळोवेळी दाद दिली त्या प्रेमाचा प्रतिसादावरच चित्रपट माध्यम व व्यवसायाचा प्रवास सुरु आहे ना? आजपर्यंत किती चित्रपट निर्माण झाले हाच फक्त इतिहास नाही.)(Deewaar)

याच पब्लिक संस्कृतीतील एक फंडा, डायलॉगला टाळ्या आणि शिट्ट्यांनी मनसोक्त मनमुराद रिस्पॉन्स देणे. कधी कधी तर असे वाटायचे की या तुफान टाळ्या शिट्ट्यांनी थिएटरचे छप्पर उडून जाते की काय? काय भारी अनुभव असे. पडद्यावरचे हे डायलॉग चित्रपटाच्या पोस्टरवर कलाकारांच्या मनोरंजनात आलेच पण त्याच्या ध्वनिमुद्रिका काढल्या गेल्या. त्याही विकत घेतल्या गेल्या, पिक्चरवरचं प्रेम..प्रेम..प्रेम.. असं भारी असते. त्यांचीही विक्रमी विक्री झाली आणि त्या सत्यनारायण पूजेला वा इतर कारणास्तव कुठे कुठे लावल्या गेल्या पण कधी तर एखाद्या पानवाला वा सलूनमध्येही लावल्या जात आणि ते भारी डायलॉग ऐकायला रस्त्यावर पब्लिक गर्दी करुन उभे राहत… (Entertainment mix masala)

पन्नास वर्षांपूर्वी असे घडल्याचे माझ्या पिढीने अनुभवलय. मी स्वतः दक्षिण मुंबईतील एखाद्या ध्वनिमुद्रिका विक्री दुकानाच्या बाहेर उभे राहून डायलॉग ऐकलेत. ते ऐकताना डोळ्यासमोर जणू आपण चित्रपट पाहत आहोत असेच ‘चित्र’ यायचे. ही ताकद त्या चित्रपटाच्या थीमची, पटकथा लेखनाची, संवादाची, दिग्दर्शकाची आणि त्या कलाकाराचीही… (गेले ते दिवस)

एक विशेष उल्लेखनीय आठवण सांगतो,

गुलशन राय (Gulshan Rai) निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित त्रिमूर्ती फिल्मचा “दीवार” (Deewaar) मुंबईत रिलीज २४ जानेवारी १९७५ रोजी प्रदर्शित झाला (पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील) आणि फर्स्ट शोपासूनच पब्लिकने त्याला असा काही डोक्यावर व डोक्यात घेतला की रसिकांच्या चार पिढ्या ओलांडूनही या चित्रपटाची ताकद कायम आहे. आजची ग्लोबल युगातील डिजिटल पिढीलाही यू ट्यूबवर ‘दीवार’ पाहण्याचे विशेष आकर्षण आहे. ‘दीवार’ (Deewaar) ची वैशिष्ट्य एक वेगळा फोकस. त्यातील एक उल्लेखनीय गोष्ट त्याचे एकेक भारी डायलॉग. पटकथा लेखन व संवाद सलिम जावेदचे आहेत आणि जोरदार संवादाने गाजला…

इसे अपनी जेब मे रख ले पीटर…अब यह ताला मै तेरी जेब से चाबी निकाल कर ही खोलूंगा (थेटरात प्रचंड टाळ्या शिट्ट्या) आणि मग असे एकेक कडक, जबरदस्त (पण आशयपूर्ण) डायलॉग पडद्यावर येत गेले की हे डायलॉग ‘दीवार’ची मोठीच ताकद ठरली.

“हाँ, मैं साइन करूंगा, लेकिन मैं अकेले साइन नहीं करूंगा, मैं सबसे पहले साइन नहीं करूंगा. जाओ पहले उस आदमी का  साइन ले के आओ, जिसने मेरा बाप को चोर कहा था; पहले उस आदमी का साइन ले के आओ जिसने मेरी माँ को गाली दे के  नौकरी से निकल दिया था; पहले उस आदमी का साइन ले के आओ जिसने मेरे हाथ पे ये लिख दिया था… उसके बाद, उस के  बाद, मेरे भाई, तुम जहाँ कहोगे मैं वहां साइन करदूंगा.”

मुंबईतील ‘दीवार’चे मेन थिएटर मिनर्व्हात चित्रपटाने पंचवीस आठवड्याचा अर्थात रौप्य महोत्सवी आठवड्याचा प्रवास सुरु असतानाच या चित्रपटाच्या डायलॉगची ध्वनिमुद्रिका व ध्वनिफीत विक्रीला आली आणि मग एखादा पानवाला रेडिओ काही काळ बंद करुन टेपरेकॉर्डर लावे आणि पुन्हा पुन्हा ‘दीवार’चे डायलॉग लावे आणि तो पान बनवत असतानाच बाकी पब्लिकही गर्दी करीत या डायलॉगचा आनंद घेत असे.

मेन थिएटर मिनर्व्हात पंचवीस आठवड्यांचा यशस्वी मुक्काम झाल्यावर निर्माते गुलशन राय यांनी आपल्या माॅडर्न मुव्हीज रिलीज या वितरणाकडून हा चित्रपट मोती थिएटरमध्ये (दक्षिण मुंबईतील गोलदेऊळ विभाग) ‘दीवार’ (Deewaar) शिफ्ट केला तेथे चित्रपटाने दिवसा तीन खेळ याप्रमाणे पन्नासाव्या आठवड्यापर्यंत मुक्काम केल्यावर ‘दीवार’ लिबर्टी चित्रपटगृहात मॅटीनी शोसाठी शिफ्ट केला आणि तेथे शंभराव्या आठवड्यापर्यंत तो मुक्कामाला होता.

‘दीवार’ शंभराव्या आठवड्यापर्यंत प्रवास करत असतानाच त्याचे डायलॉग आता त्या काळातील वाद्यवृंदातही आणि वाढदिवस सोहळ्यात बच्चे कंपनीत म्हटले जावू लागले. लोकप्रिय चित्रपट फक्त पडद्यावरच राहत नाही तर तो समाजात सगळीकडेच मुरत जातो. एखाद्या ध्वनिमुद्रिका विक्रीच्या दुकानात हमखास ‘दीवार’ (Deewaar) च्या डायलॉगची रेकार्ड लावलेली ऐकायला मिळे. आमच्या गिरगावातील रामचंद्र बिल्डिंगखाली (नंतरचे श्याम सदन) असेच एक दुकान होते आणि अनेकदा ‘दीवार’ अनुभवलेला असूनही त्याचे संवाद ऐकायला याच दुकानाबाहेरच्या गर्दीत उभा राहत असे. चित्रपटाशी अशी बांधिलकी हवी. जुन्या काळातील चित्रपट रसिकांची ही खासियत.

विजयच्या (अमिताभ बच्चन) वडिलांवर (सत्येन कप्पू) चोरीचा आळ येतो आणि त्या रागातून सहकारी कामगार विजयच्या हातावर गोंदवतात, मेरा बाप चोर है… विजय मोठा झाल्यावर मृत पित्याला अग्नि देताना हातावरचे शर्ट थोडेवर सरकते आणि तेच गोंदवलेले शब्द दिसतात… लहानपणी विजय रस्त्यावर बुट पाॅलीशचा व्यवसाय करीत असताना मुल्कराज दावर (इफ्तेखार) त्या कामाचे पैसे त्याच्या अंगावर फेकताच विजय उफाळून म्हणोत, मै फेके हुये पैसे नहीं उठाता… तो मोठा झाल्यावर दावरला याच क्षणाची आठवण देत म्हणतो, आज भी मै फेके हुये पैसे नही उठाता… आताही दुकानाबाहेर या डायलॉगला टाळ्या पडतात.

आज मेरे पास बंगला है, गाडी है, बॅन्क बॅलन्स है, क्या है तुम्हारे पास?

मेरे पास मा है…

===============

हे देखील वाचा : Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरची कसदार अदाकारी

===============

आता आमच्या गर्दीत कमालीची शांतता. डायलॉगच्या माध्यमातून एक प्रकारे हा चित्रपट पाहून होई… अशातच जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले‘ (१५ ऑगस्ट १९७५) मुंबईतील मिनर्व्हात सत्तर एम.एम आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीमने प्रदर्शित झाला आणि पटकथालेखक सलिम जावेद यांच्या अशाच जबरदस्त डायलॉगने गाजू लागला आणि काही दिवसातच त्याच्याही डायलॉगची लाॅन्ग प्ले ध्वनिमुद्रिका, ध्वनिफीती प्रकाशित झाली आणि तीदेखील शहरापासून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून लाऊडस्पीकर लावली जाताच ते डायलॉग ऐकायला गर्दी होई. (Deewaar)

आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृती अतिशय भन्नाट आहे, त्यात चित्रपट “ऐकणे” हादेखील एक भारी फंडा आहे.
“दीवार” (Deewaar) चित्रपटाला खणखणीत पन्नास वर्ष पूर्ण होताना मला अनेक गोष्टींसह त्याचे भारी डायलॉगही आठवले.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Amitabh Bacchan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News deewaar Entertainment Featured gulshan rai R D Burmen Sholay yash chopra
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.