Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द

 Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द
कलाकृती विशेष

Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द

by Jyotsna Kulkarni 26/01/2025

आज भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. (75th Republic Day) दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या प्रजासत्ताक दिनाला मोठा इतिहास आहे. या दिवसांचे महत्व देखील खूपच मोठे आहे. प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित करणारी अजून एक गोष्ट या दिनाच्या औचित्याने दरवर्षी घडते. ही गोष्ट म्हणजे पद्म पुरस्कारांच्या (Padma Award) घोषणा. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. प्रत्येकवर्षी या पुरस्कारांकडे प्रत्येक भारतीयांचे लक्ष असते. (Ashok Saraf)

भारत सरकारकडून दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार जाहीर केला जातो. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यकीय, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचे पद्म पुरस्कार खूपच खास आणि प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानास्पद ठरले. यंदा मराठी सिनेविश्वातील सुपरस्टार अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (Padmashree Ashok Saraf)

Ashok Saraf

अशोक सराफ यांना यंदा पद्मश्री (Padmashree Awards) हा भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आणि महाराष्ट्रात, मराठी सिनेविश्वात मोठा जल्लोष झाला. आपल्या प्रतिभासंपन्न अभिनयाने आणि कमळाच्या विनोदाने अनेक दशकांपासून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळणे ही सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची बाब आहे. (Marathi Top News)

अशोक सराफ यांनी आपल्या बहारदार बहुआयामी अभिनयाने नेहमीच स्वतःला एक सशक्त अभिनेता म्हणून सिद्ध केले. मराठी चित्रपट गाजवताना त्यांनी हिंदीमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अशोक मामांना मिळालेल्या या सन्मानाच्या निमित्ताने नजर टाकूया त्यांच्या एकूण अभिनय कारकिर्दीवर. (Ashok Saraf News)

अशोक सराफ मूळचे बेळगावचे मात्र त्यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. नाट्य‍ अभिनेते रघुवीर नेवरेकर (Raghuveer Nevrekar) हे अशोक सराफ यांचे मामा होते. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. अशोक मामांनी काही संगीत नाटकांतून देखील भूमिका केल्या. (Ashok Saraf Journey)

Ashok Saraf

अशोक सराफ यांनी आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळपास १० वर्षे ही नोकरी केली. काम करत असतानाही अभिनय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. याच कारणामुळे ते नोकरी सांभाळत नाटकांमध्ये देखील भाग घेत होते. नाटकांमध्ये त्यांना यश मिळू लागले आणि त्यांच्या अभिनयाच्या चर्चा सुरु झाल्या. नाटकांमध्ये यश मिळवल्यानंतर अशोक यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. (Ashok Saraf conferred with padma shri )

अशोक सराफ यांना प्रथम मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९७५ साली आलेल्या ‘राम राम गंगाराम’ सिनेमात काम केले. मात्र त्यांना खरी ओळख दिली ती त्यांच्या दुसऱ्या १९७७ साली आलेल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने. या चित्रपटामुळे त्याच्या कारकीर्दीला यशाचे शिखर मिळाले. या सिनेमानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर हळूहळू ते मराठी सिनेमाचे एक मोठे नाव बनले. त्यांनी विनोदी, गंभीर, ट्रेजडी आदी सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी सहज निभावल्या.

अशोक सराफ हे नाव मराठी सिनेविश्व गाजवत असताना त्यांना हिंदीमधून देखील सिनेमांच्या ऑफर्स यायला सुरुवात झाली. हिंदीमध्ये अशोक यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या. सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्वच दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते. अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील त्यांची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. सहाय्यक भूमिकांमधून देखील अशोक सराफ यांनी आपली छाप निर्माण केली आणि ते हिंदी विश्वात देखील लोकप्रिय झाले.

Ashok Saraf

अशोक सराफ हे मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असताना त्यांनी टेलिव्हिजन विश्वात देखील काम करण्यास सुरुवात केली. ९० च्या दशकातील सर्वांचीच आवडती आणि आजही लक्षात असणारी कॉमेडी मालिका म्हणजे ‘हम पांच’. या मालिकेमध्ये आनंद माथूर ही भूमिका साकारली आणि टीव्ही विश्वात एकच धमाका केला. टीव्ही इंडस्ट्रीच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कॉमेडी मालिका म्हणून हम पांचला ओळखले जाते.

अशोक सराफ यांची लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे या कलाकारांसोबत जमलेली जोडी नेहमीच गाजली. अशोक सराफ यांनी या कलाकारांसोबत मिळून मोठया पडद्यावर एकच कल्ला केला. दरम्यान मामांनी त्या त्या काळातील सर्वच लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम केले. मुख्य म्हणजे त्यांची जोडी प्रत्येक अभिनेत्रीसोबतच गाजली. अभिनय कारकीर्द यशस्वी होत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक घडामोडी होत होत्या.

कामामुळे लग्नाचा विचार न करणारे अशोक सराफ हे अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्या प्रेमात पडले. त्यांची प्रेमकहाणी देखील खूपच फिल्मी आणि रंजक आहे. निवेदिता आणि अशोक सराफ यांच्यात १८ वर्षांचे अंतर आहे. त्यावेळी अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आणि त्यांची जोडी गाजलीही. मात्र ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा सचिन पिळगावरचा चित्रपट दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा ठरला. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Ashok Saraf

निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या वयातील अंतर पाहता तिच्या घरातून प्रचंड विरोध झाला. तिच्या आईला चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी तिने लग्न करू नये असं वाटत होतं आणि त्यामुळे कुटुंबीयांकडून प्रचंड विरोध झाला. मात्र निवेदिता यांना अशोक यांच्याशीच लग्न करायचे होते. निवेदिता जोशी यांची मोठी बहीण डॉ. मीनल परांजपे यांनी अशोक सराफ यांच्याशी निवेदिता यांचे लग्न होण्यास्तही खूप प्रयत्न केले.

=================================

हे देखील वाचा: Almost Comedy Marathi Stand Up Show: हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’!

=================================

अखेर अशोक सराफ आणि निवेदिता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न केले. या दोघांचेही अत्यंत साधेपणाने लग्न पार पडले. लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी ब्रेक घेतला आणि त्यांच्या मुलगा अनिकेत याला सांभाळले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor ashok saraf Ashok Saraf conferred with padma shri Ashok Saraf journey Ashok Saraf special comedy actor comedy king ashok saraf hindi marathi marathi superstar Padma Award padmashree ashok Saraf republic day 2025 अशोक सराफ अशोक सराफ कारकीर्द अशोक सराफ प्रवास अशोक सराफ माहिती अशोक सराफ वैयक्तिक आयुष्य अशोक सराफ व्यवसायिक आयुष्य पद्मश्री अशोक सराफ
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.