Rakhi Sawant : महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावल्यानंतर राखी म्हणते,

Sankarshan Karhade संकर्षण कऱ्हाडेची झाली ‘देवाशी’ भेट; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
भारतामध्ये क्रिकेट (Crikcet) हा खेळ नाही तर ती एक भावना आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला क्रिकेटमधले जास्त ज्ञान नसले तरी खेळ मात्र आवडत असतो. या खेळासाठी भारतामध्ये लोकं अक्षरशः वेडी आहेत. अशाच या क्रिकेटमधला देव म्हणजे सगळ्यांचा लाडका आपला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिनमुळेच हा खेळ कदाचित भारतामध्ये एवढा लोकप्रिय झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सचिन म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन, हे समीकरणच झाले आहे. (Marathi News)
याच क्रिकेटमधल्या देवाला भेटण्याची इच्छा कोणाला नसेल. आमपासून खासपर्यंत सगळ्यांनाच सचिनला भेटण्याची इच्छा असते. जेव्हा ही इच्छा किंबहुना हे स्वप्न जेव्हा सत्यात उतरते तेव्हा तर आनंदाला पारावरच उरत नाही. मराठी अभिनेत्याचे हेच स्वप्न अखेर खरे झाले आहे. नुकतीच विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची (Sankarshan Karhade) भेट झाली आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांची भेट झाली. याबद्दलची एक खास पोस्ट आणि फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Sankarshan Karhade)
जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आलं…’भारतरत्न’ असलेल्या ‘सचिन’ बरोबर दोन तास मंचावरती उभं राहता आलं…ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदुस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली…माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनांत आहेत त्या सांगता आल्या अजून काय पाहिजे…? आकाशातल्या देवा sss आभार तू जमिनीवरचा देव दावला,” (Enteratainment Masala News)
दरम्यान संकर्षणच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. सध्या संकर्षणची ही पोस्ट कमालीची गाजत आहे. सोबतच त्याने शेअर केलेले फोटो देखील व्हायरल होताना दिसत आहे. संकर्षण हा मराठी मनोरंजनविश्वातील प्रतिभावान कलाकार आहे. केवळ अभिनयच नाही तर लेखक, कवी, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून तो प्रेक्षकांना भेटत असतो. (Marathi Latest News)
===========
हे देखील वाचा : Kishore Kumar : सवेरे का सूरज… गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!
===========
मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याचा वावर आहे. नाटक पहिले प्रेम असलेल्या संकर्षणने अनेक हिट नाटकं लिहिले असून, काही हिट नाटकांमध्ये काम देखील केले आहे. दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तो नाटकांसह वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. संकर्षणचे ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या दोन्ही नाटकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेत उदंड प्रतिसाद दिला आहे. शिवाय ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रम देखील प्रेक्षकांना खूपच आवडताना दिसत आहे.