Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Ranveer Allahbadia रणवीर अलाहाबादियाने ‘त्या’ विवादित अश्लील प्रश्नावर मागितली माफी
आजच्या तरुणाईचा अतिशय आवडता आणि लोकप्रिय यूटुबर म्हणजे रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia). आपल्या सोशल मीडियावरील चॅनेलवर विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना आमंत्रित करून तो त्यांची मुलाखत घेतो. आजवर त्याच्या चॅनेलवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या लोकांनी हजेरी लावली आहे. त्याच्या शोवर आजवर अनेक मान्यवर लोकांनी हजेरी लावली आहे. त्याचा शो आणि त्याचे अनेक रील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतात. (Ranveer Allahbadia)
ना केवळ तरुणाई तर सर्वच वयोगटातील लोकांसाठी तो नेहमीच लोकप्रिय ठरत आला आहे. समोरच्याला सहज बोलते करण्याची त्याची शैली सगळ्यांनाच कायम भावते. रणवीरची मुलाखत घेण्याची पद्धत, त्याचा त्या त्या विषयातील अभ्यास कायम फॅन्सला चकित करत असतो. खूपच कमी काळात रणवीरने त्याची मोठी ओळख तयार केली आहे. आज भारतातील सर्वात मोठा सोशल मीडिया स्टार म्हणून रणवीर अलाहाबादियाला ओळखले जाते. मात्र हाच रणवीर त्याच्या एका चुकीच्या वाक्यामुळे एका मोठ्या वादात अडकला. (Social News)
कॉमेडियन समय रैनाचा (Samay Raina) शो ‘इंडियाज गॉट लेटेंट‘ (India’s Got Latent) नेहमीच या ना त्या कारणांमुळे गाजत असतो. हा शो अनेकदा त्याच्या कॉन्टेन्टमुळे आणि इतर कारणांमुळे वादात देखील अडकला आहे. सोशल मीडियावर देखील शोला ट्रोल केले जाते. आता याचा शोमुळे रणवीर देखील वादात अडकला असून, त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (Treading News)
या शोमध्ये युट्युबर रणवीर अलाहबादिया याने विचारलेल्या एका प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे. रणवीर अलाहबादिया याने एका स्पर्धकाला पालकांबद्दल चुकीचा, अश्लील आणि आर्क्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडिओ सोहळा मीडियावर आल्यानंतर त्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. रणवीरने स्पर्धकाला विचारले होते की, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर इंटिमेट होताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचे थांबवायला आवडेल?” रणवीरच्या या प्रश्नावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. (Ranveer Allahbadia Contoversey)
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी देखील प्रतिक्रिया देताना “फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांनाच आहे. एखाद्याला दुखावण्यात कुठलंही स्वातंत्र्य नाही, मात्र अभिव्यक्तीलाही काही मर्यादा आहेत. आपण समाजात अश्लीलतेचे काही नियम लावले आहेत.” या वादानंतर रणविर विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र आता या वादानंतर रणवीरने माफी मागितली आहे. त्याने त्याचा एक व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे. (Ranveer Allahbadia Apologized)
एक्सवर माफीचा व्हिडिओ शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले, “इंडियाज गॉट लेटेंटमध्ये मी जे बोललो होतो, ते मला बोलायला नको होते. मला माफ करा.” शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “माझा प्रश्न योग्य नव्हता, आणि विनोदी देखील नव्हता, मी विनोदात तज्ञ नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी इथे आलो आहे. मी जे बोललो त्यासाठी मी कोणतेही कारण देणार नाही, मी फक्त तुमची सर्वांची माफी मागत आहे. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.”
============
हे देखील वाचा : Shammi kapoor: ‘या’ मुलींनी शम्मी कपूरचे फुटबॉल करीअर संपुष्टात आणले?
============
रणवीर पुढे म्हणाला की “कुटुंब ही अशी गोष्ट आहे ज्याचा मला कधीही अपमान करायचा नाही. या झालेल्या प्रकरणातून मी जे शिकलो ते म्हणजे या प्लॅटफॉर्मचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे.” असे म्हणत त्याने पुन्हा एकदा माफी मागितली आहे. सोबतच त्याने असे देखील सांगितले की पुन्हा त्याच्याकडून अशी चूक होणार नाही. शिवाय रणवीरने सांगितले की त्याने शोच्या निर्मात्यांना व्हिडिओमधून वादग्रस्त क्लिप काढून टाकण्यास सांगितले आहे.
दरम्यान रणवीर आणि समय आणि शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांविरुद्ध प्रथम मुंबईत आणि नंतर दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली. दिल्लीतील एका वकिलाने तर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोविरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालयात तक्रार दाखल केली आणि शोवर बंदी घालण्याची मागणी केली.