Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

नववर्ष Avinash-Vishwajeet संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास !
Avinash-Vishwajeet: सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य सिनेमांनी रसिकांच्या मनावर आपला अमीट असा ठसा उमटवला आहे. यात अनेक प्रतिभावान संगीतकारांनी तसेच संगीतकारांच्या जोड्यांनी आपला प्रभाव टाकला आहे. यामध्ये अविनाश-विश्वजीत या मराठी सिनेसृष्टीत सध्या गाजत असलेल्या संगीतकार जोडीचा ही समावेश आहे.(Avinash-Vishwajeet song)
===========================
===========================
अनेक मराठी चित्रपटांना ‘सुरेल’ करणाऱ्या अविनाश-विश्वजीत या गुणी संगीतकारांच्या या जोडीने आपल्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे यात शंका नाही.या दोघांची अनेक गाणी आज ही रसिकांच्या मनावर राज्या करत आहेत. (Avinash-Vishwajeet song)

आता या नववर्ष २०२५ मध्ये ही अनेक सुमधुर गीतांची भेट या दोघांकडून आपल्या रसिकां प्रेक्षकांना मिळणार आहे. या संगीतकार जोडीचे अनेक मराठी चित्रपट यंदाच्या वर्षी आपल्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा रसिकांना महाराष्ट्रातील विविध शहरांतून आता घेता येणार आहे.

नव्या वर्षातील पहिली सांगीतिक मैफल ही येत्या शनिवारी म्हणजेच २२ फेब्रुवारी 2025 रोजी दीनानाथ मंगेशकर रंगमंदिर, विलेपार्ले या ठीकाणी रात्री ८.४५ वा. रंगणार आहे. वसुंधरा संजीवनी या संस्थेच्या एका खास सामाजिक उपक्रमाच्या हेतूनं ही सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे.(Avinash-Vishwajeet song)
=============================
=============================
‘मुंबई -पुणे-मुंबई’ ह्या चित्रपटापासून अविनाश -विश्वजीत या भन्नाच संगीतकार जोडीची खऱ्या अर्थाने संगीतप्रेमींना ओळख झाली होती. ‘कधी तू’, ‘का कळेना’, ‘कधी तु रिमझिम झरणारी बरसात’, ‘ओल्या सांजवेळी’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘साथ दे तु मला’ या प्रेमगीतांसोबत असा हा धर्मवीर, ‘ भेटला विठ्ठल माझा’, “खंबीर तु हंबीर तु” ‘मदनमंजिरी’, ‘हे शारदे’ या सारखी आज गाजत असलेली गाणीही अविनाश -विश्वजीत यांनी संगीतबद्ध केली आहेत.