Prajakta Mali : “तिने कशालाच हद्दपार…”, प्राजक्तानं केलं आलिया भट्टचं

Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत सुरुवात करत हिंदी चित्रपटांना दिलासाच दिला आहे असं म्हलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, गेल्या काळी काळात हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांशी हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर होताना दिसत होता. मात्र, या सगळ्याचे रेकॉर्ड छावा चित्रपटाने मोडत कमी दिवसात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे विकी कौशलच्या अभिनयाच्या कारकिर्दित हा पहिला चित्रपट ठरला आहे ज्याने ३०० कोटींचा बॉक्स ऑफिसवर टप्पा पार केला आहे. (Chhaava Box Office)
‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सात दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २२५.२८ कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटींची कमाई करत २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली होती. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी ३१ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५.२५ कोटी, सहाव्या दिवशी ३२ कोटी, सातव्या दिवशी २१.५ कोटी, आठव्या दिवशी २३.५ कोटी, नवव्या दिवशी ४४ कोटी, दहाव्या दिवशी ४० कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ३२६.७५ कोटी कमावले आहेत. (Chhaava Box Office)
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, संतोष जुवेकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
’छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी लाकृती मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध विषयांवर गप्पा मारत आठवणींना उजाळा दिला. यावेळी चित्रपटात महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना हिची निवड का केली याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “ज्यावेळी ‘छावा’ हा चित्रपट करायचा निर्णय मी घेतला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना असतील हे पक्क करुनच मी लिखाणाला सुरुवात केली होती. कारण, पर्सनली मला रश्मिकाच्या डोळ्यातील साधेपणा, तिची उंची, तिचा नाजूकपणा इतका भावला होता की महाराणी येसुबाई अशाच असतील असं मी मनात चित्र तयार केलं आणि त्यामुळे येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका असावी हे पुर्णपणे दिग्दर्शकाची चॉईस होती. शिवाय, चित्रपटातील प्रत्येक कलाकार आपली भूमिका जगलाय आणि विकी कौशलबद्दल तर काय भावना व्यक्त कराव्या मला समजतच नाही आहे. एका सीनच्या शुटवेळी त्याला दुखापत झाली होती त्यामुळे आम्ही १ महिना शुट थांबवलं होतं. त्यामुळे मी कायम म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना खरोखरीच महाराज त्याच्या नसानसांत भिनले होते”. (Chhaava box office)