
Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ (Chhaava) १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात शंभु राजांची भूमिका विकी कौशलने साकारली असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकली आहे. १२ दिवस चित्रपट प्रदर्शित होऊनही अजून प्रेक्षक मोठ्या संख्येने जाऊन हा चित्रपट पाहात आहेत. छावा चित्रपटाती शेवटचे काही सीन्स अंगावर शहारा आणि डोळ्यांमध्ये पाणी आणतात. शिवाय यात गणोजी आणि रान्होजी यांची भूमिका साकारणाऱ्या सुव्रत जेशी (Suvrat Joshi) आणि सारंग साठ्ये (Sarang Sathaye) यांची विशेष चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. अगदी प्रेक्षक मला मारायला निघाले असं स्वत:चं सारंग म्हणाला आहे. नेमकं असं तो का बोलतोय जाणून घेऊयात…
‘छावा’मध्ये सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशी यांनी गणोजी आणि कान्होजी या भूमिका साकारल्या आहेत. सारंग पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत झळकला असल्याचं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून कैद केलं जातं असा अंगावर शहारा आणणारा सीन आहे.

गणोजींच्या भूमिकाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला असा प्रश्न सारंग साठ्येला एनडीटीव्हीच्या मुलाखतीत विचारण्यात आल्यावर तो.म्हणाला, “गणोजींची भूमिका पाहून मला मारायला निघालेत प्रेक्षक… त्यामुळे मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांबद्दल काही बोलणार नाही. त्यांचं सुद्धा बरोबरच आहे कारण, ती साधी गोष्ट नाहीये. स्वराज्याला तडा जाईल अशी गोष्ट त्या पात्राने केली होती. त्यामुळे अर्थातच त्यांचा रोष स्वीकारायला मी तयार आहे.” (Sarang Sathaye)
पुढे सारंग (Sarang Sathaye) म्हणाला की, “पण, याचबरोबर मी एक गोष्ट सांगतो की, लक्ष्मण सरांनी आम्हाला कास्ट यासाठी केलं होतं कारण, त्यांचं असं म्हणणं होतं दोन असे कलाकार ज्यांनी याआधी फार गोड कामं केली आहेत, त्यांनी याआधी कधीही निगेटिव्ह भूमिका केलेली नाही, अशा दोन कलाकारांनी जर ही भूमिका केली तर, लोक कदाचित अंदाज बांधू शकणार नाहीत की, हे दोघं पुढे जाऊन असं काहीतरी करतील. मग, ते लोकांच्या पण आणखी जिव्हारी लागेल. त्यामुळेच आमचं कास्टिंग झालं होतं. आमच्या मनात खूप खूप धकधक होती पण, लक्ष्मण सरांना माहिती होतं हे वर्क होईल त्यामुळे यामागचं सगळं क्रेडिट त्यांचं आहे.” असं सारंग साठ्येने सांगितलं. (Bollywood trending news)
============
हे देखील वाचा : Chhaava : अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ची कोटींची दहाड
============
‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार १२ दिवसांत ‘छावा’ ने ३६३.३५ कोटींची कमाई करत यशस्वीरीत्या दुसऱ्या आवड्यातही छप्पर फाड कमाई केली आहे. १२ व्या दिवसाच्या कमाईची यापुर्वी आलेल्या चित्रपटांच्या कमाईसोबत तुलना केल्यास कल्की २८९८ एडी आणि अॅनिमल या दोन्ही चित्रपटांना ‘छावा’ने मागे टाकलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘कल्की’ चित्रपटाने १२व्या दिवशी १०.०४ कोटी, ‘अॅनिमल’ने १२.७२, तर ‘बाहुबली २’ ने १५.७५ कोटी कमावले होते. आणि ‘छावा’ने १२व्या दिवशी १८ कोटींची कमाई केलीये. दरम्यान, जगभरातील कमाईची आकडेवारी छावा चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे पार कधीच केली आहे. (Box office collection)