
Mere Husband Ki Biwi Movie चित्रपटाचं हे नाव ‘या ‘मराठी मालिकेतून सुचलं
अर्जुन कपूर (Arjun Kapoor), भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग (Rakulpreet Singh) यांची प्रमुख भूमिका असणारा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘मेरे हसबंड की बीवी’ हा नुकताच प्रदर्शित झाला. नावावरूनच कथानक भन्नाट असणार असा अंदाज नक्कीच बांधता येऊ शकतो. चित्रपटाची कास्टिंग जितकी हटके आहे तितकंच नाव हटके आहे. पण तुम्हाला माहित आहे का झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेवरुन या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. (Mere Husband Ki Biwi Movie)
खरं तर, ज्यावेळी ‘मेरे हसबंड की बीवी’ चि६पटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळीच गाजलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको बऱ्याच लोकांना आठवली होती. आणि त्याचप्रमाणे एका मुलाखतीत बोलताना भूमी म्हणाली की चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे मराठी भाषेतील कंटेन्ट फार पाहतात. आणि त्यांना झी मराठी वाहिनीलरील माझ्या नवऱ्याची बायको याच मालिकेच्या शीर्षकावरुन हे नाव सुचलं होतं. शिवाय त्यांनी ती मालिका देखील पाहिली होती असं देखील भूमी (Bhumihar Pednekar) म्हणाली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत अनिता दाते, अभिजित खांडकेकर, आणि रसिका सुनिल यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

बॉक्स ऑफिसवर ‘मेरे हसबँड की बीवी’ (Mere Husband Ki Biwi Movie) ने सुरुवातीच्या आठवड्यात अपेक्षित यश मिळवलं नाही. खरंतर छावा चित्रपटामुळे या चित्रपटाला जरा बॉक्स ऑफिस गाठणं कठिण झालं होतं. आत्तापर्यंत ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ५.५५ कोटींची कमाई केली आहे. केवळ ६ दिवसांत ६ कोटींचा टप्पा गाठू न शकणारा चित्रपट पुढे अधिक कमाई करु शकेल का असा प्रश्न उभा राहिला आहे.