
Salman Khan : ‘सनम तेरी कसम’मध्ये दिसला असता सलमान खान?
हिंदीतील २००० च्या काळातील कोणताही प्रेमपट घ्या सलमान खान, शाहरुख खान यांनी साकारलेले रोमॅंटिक रोल आजही आपल्या लक्षात आहेत. सलमान खानने (Salman Khan) गाजवलेला प्रेम तर लाखो दिलों की धडकन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुळात बॉलिवूड म्हटलं की रोमॅंटिक चित्रपटांचीच नावं आपसुकच ओठांवर येतात. आणि अलीकडे ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘क्यु की’ यासांरखे कथानक असणारे रोमॅंटिक चित्रपट येत नाहीत याची खंत वाटते.
‘जान ए मन’, ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अशा काही चित्रपटांच्या कथानका जवळ जाणारा एक चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता तो म्हणजे ‘सनम तेरी कसम’ (Sanam Teri Kasam). त्यावेळी या चित्रपटाची प्रेक्षकांनी केराची टोपली दाखवली होती पण आता ज्यावेळी हा चित्रपट रि-रिलीज झाला आहे त्यावेळी नवी पिढी मोठ्या संख्येने जाऊन हा चित्रप पाहात आहेत आणि त्यांना तो आवडतोय. पण तुम्हाला माहित आहे का जर का हा चित्रपट ९०च्या दशकात आला असता तर त्यात सलमान खान (Salman Khan) मुख्य भूमिकेत झळकला असता. जाणून घेऊयात नेमके प्रकरण आहे तरी काय? (Bollywood trending news)

‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विनय साप्रु यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं की जर का हा चित्रपट ९० च्या दशकात आला असला तर नक्कीच प्रमुख भूमिकेसाठी सलमान खान (Salman khan) हाच पहिली चॉईस असता. सलमान खान सध्या सिकंदर चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून तिथेच विनय यांची सलमानची भेट झाली. सलमान खानने लकी हा चित्रपट करुन विनय यांच्या करिअरची एक भरारी दिली होती असं त्यांनी सांगितलं. “ज्यावेळी सनम तेरी कसम या चित्रपटाची झलक विनय यांनी सलमानला दाखवली होती त्यावेळी सलमान त्यांना म्हणाला होता की हा चित्रपट हिट होईल. अर्थात ज्यावेळी तो प्रदर्शित झाला तेव्हा नाही पण आता रि-रिलीजमध्ये या चित्रपटाने उत्तम कमाई केली आहे याचा आनंद आहे. शिवाय माझ्या करिअरसाठी लकी हा चित्रपट सलमानने केला होता. चित्रपट फारसा गाजला नाही पण त्याची गाणी लोकप्रिय नक्कीच झाली आणि त्यानंतर सनम तेरी कसम हा चित्रपट केला त्यामुळे सलमानमुळेच ब्रेक मिळाला असं मी नक्की सांगेन”, असं म्हणत त्यांनी सलमानचे आभारही मानले. (Bollywood update)
==================
हे देखील वाचा :Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा
==================
९०च्या दशकात ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट जर का आला असता तर सलमानसोबत कुठल्याही नवख्या अभिनेत्रीला ब्रेक दिला असता असं देखील इंडिया टुडेशी बोलताना विनय म्हणाले. ९०च्या काळातील सलमान (Salman Khan) हा आयकॉनिक रोमॅंटिक हिरो आहे आणि आजही त्याने त्याचं स्टारडम टिकवून ठेवलं आहे याचा आनंद आहे. सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर बिश्नोई गॅंगमुळे चर्चेत होता. पण आता पुन्हा एकदा त्याने मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्याचा निर्णय घेतला असून सिकंदर चित्रपटातून तो दमदार एंट्री घेणार आहे. दरवर्षी ईदच्या निमित्ताने सलमान त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देतो आणि यंदाही तो सिकंदरच्या निमित्ताने पुन्हा भेटला येणार आहे.