Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Varsha Usgoankar : “खुदको बडी….”; मिथुन चक्रवर्ती का डाफरलेले?
८०-९०च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने मराठीच काय पण हिंदी चित्रपसृष्टीदेखील गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा आज (२८ फेब्रुवारी) वाढदिवस. मुळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर यांनी ‘गंमत जंमत’ या चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पाऊल टाकलं. घाऱ्या डोळ्यांच्या देखण्या वर्षा उसगांवकर याचं त्या चित्रपटाची ‘मी आले निघाले’ हे गाणं आजही तितकंच ताजतवाणं वाटतं. वर्षा उसगांवकर यांनीमराठी चित्रपसृष्टी गाजवलीच पण हिंदीतही ‘घर जमाई’, ‘सोने की जंजीर’, ‘दुध का कर्ज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिथुन चक्रवर्ती वर्षा यांना प्रचंड ओरडले होते आणि त्यांना फैलावर घेतलं होतं त्याचा एक किस्सा जाणून घेऊयात.(Varsha Usgoankar)
वर्षा उसगांवकर (Varsha usgoankar) यांनी लोकमत फिल्मिला दिलेल्या एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासोबतची एक रंजक आठवण सांगितली होती. ‘शिकारी’ या चित्रपटाच्या शुटींगचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की, “मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत शिकारी आणि अजून दोन तीन चित्रपट मी केले होते. त्यांच्या काही आवडत्या दोन-तीन फिमेल सहकलाकरांपैकी मी एक त्यांच्या आवडीची अभिनेत्री होते. मिथुन यांच्यासोबत मी ‘शिकारी’ चित्रपट केला होता ज्यात एक रशियन मुलगी आणि मी होते. तर एक सीन रशियन भाषेत आणि एक हिंदीत असा तो चित्रपट शुट झाला. त्या चित्रपटात नावाप्रमाणेच हत्ती, घोडे असे अनेक प्राणी होते. त्या चित्रपटाचं शुटींग दिल्ली, मुंबई आणि रशियात झालं होतं. तर ज्यावेळी रशिया, दिल्लीला शुटला जावं लागत होतं तेव्हा एअरपोर्टला मी माझ्या ड्रायव्हरला आधी चेकईन करण्यासाठी पाठवायचे. बरं आत्तासारखा तामझाम नव्हता की आधारकार्ड किंवा इतर डॉक्युमेंट्स दाखवा वगैरे”.

“तर शुटला जायचं होतं आणि तेव्हा मी आणि माझी बहिणचं घरी होतो आई नव्हती उठवायला. मी (Varsha usgoankar) अलार्म लावला आणि सकाळी तो वाजल्यावर माझ्या बहिणीने बंद केला आणि मी झोपूनच राहिले. काहीवेळाने जाग आली आणि माझा ड्रायव्हर माझी वाट बघत थांबला होता. मी धडपडतच एअरपोर्टला पोहोचले. तिथे आमच्या चित्रपटाचे निर्माते माझीच वाट पाहात होते. ते म्हणाले की मॅडम लवकर जा तिथे ९ वाजता शुटींग होतं म्हणून ६ ची फ्लाईट केली होती. त्यांचं ऐकताच मी गेले विमानात बसले आणि लोकेशनवर पोहोचले. तिथे गेल्यावर मिथुन चक्रवर्तींनी जे मला फैलावर घेतलं होतं की सांगता सोय नाही”. (Bollywood classic movies)
======
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
======
पुढे बोलताना वर्षा (Varsha usgoankar) म्हणाल्या की, “मिथुन मला ओरडत होते की तु माझ्यापेक्षा मोठी स्टार झाली आहेस का?? फ्लाईटचा बोर्डिंग पास घ्यायला ड्रायव्हरला पाठवतेस? यापुढे तुझं तु जायचं, आपण जो कोणता चित्रपट करतो त्यासाठी निर्मात्यांचे पैसे लागले असतात आणि तु असा निष्काळजीपणा करतेस? यापुढे असं होऊ द्यायचं नाही. आणि त्यावेळी मी त्यांचा तो जमदग्नी अवतार पाहिल्यानंतर एकही फ्लाईट मिस केली नाहीये. अगदी गोव्याला घरी जायचं जरी असेल तरी लाईट मिस होईल या भीतीने मी लवकर एअरपोर्टवर पोहोचते. पण त्यादिवशी खरंच मिथुन दादांनी एक महत्वाचा धडा मला शिकवला होता की आपल्या कामांसोबत कधीच हलगर्जीपणा करायचा नाही आणि वेळेचं महत्व आणि किंमत जाणून घ्यायची”. (Bollywood update)

वर्षा उसगांवकर ३८ वर्षांपासून हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. या इतक्या वर्षांच्या. कारकिर्दित त्यांनी ‘हमाल दे धमाल’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘साथी’, ‘हस्ती’ असे अनेक चित्रपट केले. आजही त्यांच्या सौदर्याची जादू कायम आहे,. नुकत्याच त्या मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसल्या होत्या. मराठी चित्रपसृष्टीसाठी त्यांनी अभिनयातून दिलेले योगदान खरंच कौतुकास्पद असून त्यांच्या कामाला आम्ही सलाम करतो! (Entertainment masala)