Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Ranjana Deshmukh: “कुण्या गावाचं आलं पाखरू…” आठवणींतील रंजना!
रंजना (Ranjana Deshmukh) यांना अभिनयाचं बाळकडू घरातून मिळालं. त्यांच्या आई या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख होत्या तर त्यांच्या मावशी अभिनेत्री संध्या या ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या पत्नी. त्यामुळे बालपणापासूनच चित्रपट हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग होता. बालकलाकार म्हणून अभिनयाचा सुरुवात करणाऱ्या रंजना यांनी त्यांच्या अभिनयातून राजा गोसावी, अशोक सराफ, रविंद्र महाजनी, कुलदीप पवार या अभिनेत्यांना तोडीस तोड टक्कर दिली होती. रोमॅंटिंक असो किंवा विनोदी रंजना यांनी प्रत्येक भूमिका अगदी चोख बजावली. (Marathi film Update)
“कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डौलात न खुदु खुदु हसतंय गालात….” डोळ्यांसमोर लगेच रंजना यांचा चेहरा आला. नाकात नथ, चापून चोपून नसलेली नऊवार साडी, माथ्यावर कुंकु आणि डोक्यावर पदर खरंच किती देखणे रुप असेल ना असा श्रृंगार केलेल्या स्त्रीचं. आणि तीच पारंपारिक वेशातील स्त्री तुन्हाला स्लीव्हलेस ब्लाऊज, केसांचा बॉबकट, जीन्स आणि शर्ट अशा लूकमध्ये दिसली तर विश्वास बसेल का? कदाचित उत्तर असेल नाही. पण ७० च्या दशकातील एका अभिनेत्रीने ही दोन्ही रुपं लीलया सांभाळली आणि त्या म्हणजे रंजना देशमुख. आज ३ मार्च रंजना देशमुख यांची पुण्यतिथी. ३ मार्च २००० साली रंजना यांचं निधन झालं आणि मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्री सगळ्यांचीच मनं सुन्न करुन गेली. एका अपघातामुळे रंजना यांना जीवाला मुकावं लागलं आणि परिणामी एक लेडी सुपरस्टार आपण हरवून बसलो. (Ranjana Deshmukh)

रंजना यांचा अपघात होण्यापूर्वी पंढरीची वारी या चित्रपटासाठी त्यांची प्रमुख नायिका म्हणून निवड झाली होती; अगदी पोस्टर्सदेखील छापले गेले होते. इतकंच नाही तर चित्रपटाचं ७० टक्के शुटींगही झालं होतं असं सांगण्यात आलं. पण त्याचदरम्यान ‘झुंजार’ या चित्रपटाच्या शुटींगसाठी जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांचे (Ranjana Deshmukh) दोन्ही पाय निकामी झाले आणि हाताला गंभीर दुखापत झाली. आणि त्यानंतर जयश्री गडकर यांनी पंढरीची वारी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. १९७५ ते १९८७ या अवघ्या १२ वर्षांच्याच अभिनय कारकिर्दीत रंजना यांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपट देत राज्य सरकारचे पुरस्कारही पटकावले होते. (Entertainment masala)
============
हे देखील वाचा : Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
============
वयाच्या पाचव्या वर्षीच ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर १९६६ साली व्ही शांताराम यांनी रंजना यांना लाडकी सह्याद्री की या चित्रपटात ब्रेक दिला. पुढे ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘झुंज’, ‘असला नवरा नको गं बाई’, ‘हळदी कुंकू’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’, ‘भुजंग’, ‘एक डाव भूताचा’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. चानी या चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. एका आदिवासी स्त्रीवर इंग्रज अधिकारी बलात्कार करतो आणि त्यातून जन्मते ‘चानी’. त्यामुळे फॉरेनर लोकांसारखे केस, निळे डोळे आणि त्यात तोंडी आदिवासी भाषा अशी चानीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याशिवाय ‘मुंबईचा फौजदार’ आणि ‘बिनकामाचा नवरा’ या चित्रपटातील प्रत्येक संवाद आजही आपल्याला तोंडपाठ असून तो चित्रपट जर का टीव्हीवर आजही लागला तरी चॅनल बदण्याची इच्छा नक्कीच होणार नाही.
रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांची मनोरंजनसृष्टीतून खूपचं लवकर आणि अकाळी एक्झिट झाली. रंजना यांनी मराठीच नव्हे तर त्यांनी हिंदी चित्रपटातही कामं केलं होतं. १९९३ साली आलेल्या ये दिल्लगी या चित्रपटात अक्षय कुमार, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबत रंजना झळकल्या होत्या. आज जर का रंजना असत्या तर मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरा फारच निराळा असता यात शंका नाही. (Bollywood update)

देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याने मोहिनीच केली होती. रंजना देशमुख आज जरी या जगात नसल्या तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे चित्रपट आणि साकारलेल्या अजरामर भूमिका आजही जीवंत आहेत. ब्लॅक अँड व्हाईट ते रंगीत चित्रपट असा प्रवास करणाऱ्या रंजना यांच्या जीवनावर आधारित ‘रंजना : अनफोल्ड’ (Ranjana Deshmukh) हा चरित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंग भेटीला घेणार असून ‘कलाकृती मिडिया’शी बोलताना त्यांनी चित्रपटाचं लिखाण पुर्ण झालं असून लवकरच चित्रिकरणाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. २०२६ मध्ये रंजना यांचा बायोपिक भेटीला येईल असे वारंग म्हणाले. (Ranjana Deshmukh biopic)