Mumbai theatres : पूर्वी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र रांग असे….

Amitabh Bachchan आणि विनोद खन्नाचा ‘खून पसीना’ आठवतो का ?
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची अँग्री यंग मॅन ही इमेज जंजीर (१९७३) च्या यशानंतर तयार झाली. त्यांच्या या इमेजचा फायदा प्रत्येक दिग्दर्शक आणि प्रत्येक निर्माता घेऊ पाहत होता. मनमोहन देसाई प्रकाश मेहरा हे दोघे यात आघाडीवर होते. १९७७ साली Amitabh Bachchan आणि विनोद खन्ना यांचा ‘खून पसीना‘ प्रदर्शित झाला आणि सुपर हिट झाला. खरंतर हा चित्रपट राकेश कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. हा सिनेमा त्यांना कसा मिळाला?

हा सिनेमा प्रकाश मेहरा यांचे भाऊ बब्बू मेहरा यांनी निर्माण केला होता. हा सिनेमा प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला नाही. ते आपल्या अन्य सिनेमांमध्ये बिझी असल्यामुळे त्यांनी हा चित्रपट त्यांच्या आवडत्या असिस्टंटकडे राकेश कुमार यांच्याकडे दिग्दर्शन करायला दिला. यापूर्वी त्यांनी प्रकाश मेहरा यांना जंजीर आणि समाधी या चित्रपटात सहाय्य केले होते. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), विनोद खन्ना, रेखा भारत भूषण, असरानी, कादर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यावर्षी प्रदर्शित झालेला चित्रपटामध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता अमर अकबर अँथनी आणि Khoon Pasina हा सहाव्या क्रमांकावर होता. अमिताभचा हा एक अंडर रेटेड सिनेमा समजला गेला पण सिनेमा भन्नाट होता.
या चित्रपटापासून कादर खान मुख्य खलनायक यांच्या भूमिकेत दिसू लागला. कादर खान यांचे या चित्रपटातील नाव जालीम सिंग होते. हा चित्रपट झाला तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि तिथे जालीम सिंग नावाचा एक उमेदवार निवडणूक लढवत होता. त्याने निवडणूक आयोगाकडे रीतसर अर्ज करून हा चित्रपट हिमाचल प्रदेशमध्ये प्रदर्शित करू नका असे सांगितले. हा चित्रपट जर राज्यात प्रदर्शित झाला तरी यातील जालीम सिंग या नावाचा माझ्या मतदारांवर नकारात्मक परिणाम होईल म्हणून त्याने कोर्टात देखील अपील केले होते. निवडणूक आयोगाने त्याची विनंती मान्य केली आणि हा चित्रपट निवडणुका झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये प्रदर्शित झाला. (Bollywood takda)

हा सिनेमा तसा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या टॉप मुव्हीजमध्ये गणला जात नाही पण अमिताभच्या दृष्टीने या सिनेमाच्या खूप महत्त्व आहे. कारण या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानच त्याच्या मुलाचा अभिषेकचा जन्म झाला. अमिताभ बच्चन यांनी मध्ये ब्लॉगमध्ये याची सविस्तर माहिती दिली आहे. ५ जानेवारी १९७६ या दिवशी अभिषेकचा जन्म झाला आणि याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटातील वाघासोबत चा सुपसिद्ध फाईट सीन आहे. खरं तर ही वाघीण होती आणि तिचे नाव भारती होते.
Rakesh Kumar यांनी त्यांच्या ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटातीत देखील याच वाघिणीसोबतचा फाईट सीन ठेवला होता. या सिनेमाचे अमिताभ बच्चन यांचे टायगर हे नाव देखील राकेश कुमार यांनीच ठेवले होते. ते या नावाच्या इतके प्रेमात होते की त्यांनी अमिताभला घेऊन ‘टायगर’ नावाच्या एका सिनेमाची घोषणा देखील केली होती. परंतु हा चित्रपट अर्धवटच राहिला.
दिग्दर्शक राकेश कुमार आणि अमिताभ (Amitabh Bachchan) यांची या काळात चांगली दोस्ती झाली होती कारण यानंतर मि. नटवरलाल, दो और दो पांच हे चित्रपट त्यांनी एकत्र केले. अमिताभने आपला ब्लॉगमध्ये लिहिताना सांगितले की, “राकेश कुमार आणि माझी चांगली मैत्री झाली होती. आम्ही खून पसीना, मि. नटवरलाल, दो और दो पांच, याराना हे सिनेमे एकत्र केले. सेटवर माझ्यापेक्षा उंच असलेली एकच व्यक्ती तिथे मला दिसायची ती म्हणजे राकेश कुमार! कारण माझी उंची सहा फूट दोन इंच असली तरी राकेश कुमार यांची उंची सहा फूट चार इंच होती.“ ‘खून पसीना‘ या चित्रपटातील विनोद खन्ना स्वत:च्या भूमिकेबाबत ते खूप नाराज होते.

विनोद खन्ना यांनी याबाबत राकेश कुमार यांच्याशी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राकेश कुमार आणि प्रकाश मेहरा यांनी स्क्रीन प्लेमध्ये बदल करून अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) समांतर भूमिका त्यांना दिली. या सिनेमाचा तेलगू आणि तामिळमध्ये देखील रीमेक केला गेला. त्याच्यात तमिळ आवृत्तीचे नाव होते ‘शिवा’ आणि यात प्रमुख भूमिका रजनीकांत यांनी केली होती. तर तेलगू आवृत्तीचे नाव होते ‘टायगर’ आणि त्यात अमिताभची भूमिका एन टी रामाराव यांनी केली होती. या चित्रपटाचे सर्व शूटिंग जम्मू आणि काश्मीरमध्ये झाले होते.
============
हे देखील वाचा : Yogesh : ‘जिंदगी कैसी है पहेली…’ या गाण्याच्या निर्मितीची भन्नाट कथा!
============
गंमत म्हणजे त्याच काळात अमिताभच्या (Amitabh Bachchan) आणखी दोन चित्रपटाची शूटिंग देखील तिथे चालू होते. ‘कभी कभी’ आणि ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला अमिताभ बच्चन यांची सर्व फॅमिली तिथे उपस्थित होते. त्यामुळे ‘कभी कभी‘ या चित्रपटातील शशी कपूरच्या विवाह प्रसंगातील दृश्यामध्ये आपल्याला हरिवंशरा बच्चन आणि तेजी बच्चन देखील दिसतात. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा पहिला सिनेमा ‘दो अंजाने’ (१९७६) साली आला होता. १९७७ साली या दोघांचे एकत्रित तीन चित्रपट आले होते.
आलाप, इमान धरम आणि खून पसीना. अर्थात इमान धरममध्ये रेखा अमिताभची नायिका नव्हती. ‘आलाप’ फ्लॉप झाला. ‘इमान धरम’ आता कुणाला आठवत देखील नाही. ‘खून पसीना’ मात्र गाजला. अमिताभ (Amitabh Bachchan) रेखाच्या प्रेम प्रसंगाच्या चर्चा इथूनच रंगू लागल्या. या सिनेमाला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते. ‘तू मेरा हो गया मै तेरी हो गयी, खून पसीने की जो मिलेगी तो खायेंगे, बनी राहे जोडी राजा रानी कि जोडी रे‘ ही गाणी त्या काळात गाजली होती. या सिनेमातील डायलॉगची एल पी रेकॉर्ड देखील निघाली होती.