Mumbai theatres : पूर्वी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र रांग असे….

Tamannaah Bhatia आणि VIjay Varma यांचे झाले ब्रेकअप? २५ दिवसांनंतर मोठा पुरावा आला समोर…
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी विजय वर्मा (Vijay Varma आणि तमन्ना भाटिया (Tammanaah Bhatia) यांच्यातील नाते संपुष्टात आले आहे. दोघांनीही त्यांच्या वाटा वेगवेगळ्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचताच सर्वांनाच धक्का बसला आहे. लग्नाच्या बातम्या समोर येत असतानाच ते वेगळे कसे होतील यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये . जेव्हा दोघांनी ही इन्स्टाग्रामवर त्यांचे सर्व फोटो डिलीट केले तेव्हा त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. पण अजूनही त्यांच्या ब्रेकअपचे कारण कोणालाच समजलेले दिसत नाही. (Tamannaah Bhatia And VIjay Varma Breakup)

दरम्यान, काही पुरावे समोर येत आहेत जे चाहते त्यांच्या विभक्त होण्याचे कारण देत आहेत. याव्यतिरिक्त, बर्याच चाहत्यांचा दावा आहे की त्यांच्या नात्यातील दुरावा फेब्रुवारीमध्येच दिसून आला होता. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी 2022 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती आणि त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांना कपल गोल देत दोघांनी अचानक आपलं नातं संपुष्टात आणलं आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघे वेगळे झाले आहेत, जरी त्यांचे लग्नहोत नसले .पण तरीही ते मित्र राहण्याचा विचार करत आहेत, दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो काढून टाकल्याच्या बातम्या येत आहेत, पण त्यांचे काही फोटो अजूनहीत्यांच्या प्रोफ़ाइलवर पहायला मिळत आहेत. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी 2022 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती. जून 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज 2‘ च्या सुजॉय घोषच्या सेगमेंटमध्ये ते एकत्र दिसले होते. या सीरिजमध्ये तमन्नाने विजयसाठी नो किसिंग पॉलिसी मोडली आणि बोल्ड सीन्स दिले. (Tamannaah Bhatia And VIjay Varma Breakup)
===============================
हे देखील वाचा: Zohra Jabeen Teaser: रमजानमध्ये Salman Khanची चाहत्यांना भेट, ‘सिकंदर’मधलं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज…
===============================
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तमन्नाने जून 2023 मध्ये फिल्म कंपॅनियनला दिलेल्या मुलाखतीत विजयसोबतच्या नात्याला दुजोरा दिला. मात्र त्यांचे ब्रेकअप कशामुळे झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. तमन्ना आणि विजयने अद्याप त्यांच्या ब्रेकअपबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.