
Amitabh Bachchan : नेपोटिझमवरून बिग बींनी घेतली अभिषेकची बाजू,म्हणाले..
हिंदी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम हा विषय कायमच वादाचा ठरला आहे. सुपरस्टार कलाकारांच्या मुलांना कायमच त्यांच्या आई-वडिलांसोबत किंवा त्यांच्या अभिनयासोबत कम्पेअर केलं गेलं आहे. यात शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, बॉबी देओल, सनी देओल अशी अनेक मुलं या नेपोटिझमच्या वादात भरली गेली. या व्यतिरिक्त आत्ताची नवी पिढी मग अनन्या पांडे असेल सोनाक्षी सिन्हा असेल किंवा सारा अली खान असेल या प्रत्येकालाच नेपोटिझमचा सामना करावा लागलाय. अमिताभ बच्चन हे कायमच देशात किंवा एकूणच समाजात घडणाऱ्या गोष्टींवर आपली मतं मांडत असतात. पण नेपोटिझम वर पहिल्यांदाच खरंतर बिग बी यांनी आपलं मत मांडत मुलगा अभिषेक बच्चन याची बाजू घेतली आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घेऊयात… (Amitabh Bachchan)
Amitabh bachchan हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. कायम त्यांच्या X अकाउंटवरून ते चर्चेत असतात. तर अशीच एक सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि नेपोटिझमवर एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यात लिहिलं होतं की, “अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चांगले चित्रपट केले असले तरी, ते अनावश्यकपणे घराणेशाहीच्या नकारात्मकतेचा बळी ठरले आहेत”. यावर अमिताभ यांनी कमेंट करत लिहिलं आहे की, मलाही असच वाटतं… केवळ मी त्याचा वडील आहे म्हणून नाही”. त्यामुळे मोजक्या शब्दांत अमिताभ यांनी नेपोटिझमवर केलेल्या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

अमिताभ जसं इतर कलाकारांच्या कामाचं कौतुक करतात त्याचप्रमाणे त्यांनी अभिषेकच्या कामालाही कायम दाद दिली आहे. त्यांनी ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटातील अभिषेकच्या कामाचे कौतुक करत त्याला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘काही चित्रपट तुमचे मनोरंजन करतात, काही चित्रपट तुम्हाला त्यांच्याशी जोडण्यासाठी आमंत्रित करतात, ‘आय वॉन्ट टू टॉक’ तेच करते.’ अभिषेक, तू अभिषेक नाहीस, तू चित्रपटाचा अर्जुन सेन आहेस. लोक जे काही म्हणत आहेत, ते त्यांना म्हणू द्या’. (Bollywood gossip)
============
हे देखील वाचा :Salman Khan : ‘सनम तेरी कसम’मध्ये दिसला असता सलमान खान?
============
भविष्यात नेपोटिझम संपेल की नाही माहित नाही पण कलाकारांना त्यांच्या अभिनय कौशल्यावर दाद मिळाली पाहिजे. कारण, निव्वळ आई वडील स्टार असतील तर मुलांमध्ये त्यांचे गुण येतीलच असं नाही. आणि नेपोटिझम किंवा अन्य वादाबद्दल बोलण्यापेक्षा प्रेक्षकांना चांगले चित्रपट देण्यावर अधिक भर देणं गरजेचं आहे. (Bollywood update)