MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

Chhaava : बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची दहाड; ५०० कोटी पार करत रचला इतिहास
“हम शोर नही करते…सिधा शिकार करते है…” खरंच विकी कौशलच्या Chhaava चित्रपटाने अक्षरश: लोकांना वेड लावलं आहे. आत्तापर्यंत लोकांचा सर्वसामान्यपणे असा समज होता की शाहरुख खान, प्रभास, Salman khan, आमिर खान यांचेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत नवे रेकॉर्ड बनवतात. पण ती म्हण आहे ना ‘कानामागून आली आणि तिखट झाली’; इथे विकी कौशलला ही म्हण अगदी तंतोतंत जुळते. विकीच्या ‘छावा’ चित्रपटाने यशस्वीरित्या ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करत ५०२.७० कोटींचा गल्ला जमवला आहे. आता चित्रपटाने ६०० कोटींकडे वाटचाल सुरु केली असून बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा पराक्रम करणारा ‘छावा’ हा आठवा चित्रपट ठरला आहे. अजूनही बरेच रेकॉर्ड ‘छावा’ने केले आहेत. ते धमाकेदार रेकॉर्ड्स कोणते आहेत, जाणून घेऊयात..(Chhaava box office collection)
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ला जगभरातून प्रेम मिळतंय. ‘छावा’ने हिंदी बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींची कमाई केली. यापूर्वी ‘बाहुबली-२’, ‘पठाण’, ‘जवान’, ‘Animal’, ‘गदर-२’, ‘स्त्री-२’, ‘पुष्पा-२’ याच चित्रपटांना हा आकडा पार करता आला होता. त्यातच ‘बाहुबली’ आणि ‘पुष्पा’ हे दोन्ही तेलुगू डब्ड मूव्ही होते. त्यामुळे ऑलटाईम ब्लॉकबस्टर ठरत ‘छावा’ आता या आयकॉनिक पंक्तीत जाऊन बसला आहे. ‘छावा’ने आतापर्यंत वर्ल्डवाईड ७०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

आता रेकॉर्ड्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकी कौशलच्या एकाही चित्रपटाने आजपर्यंत फर्स्ट डे कलेक्शनच्या बाबतीत १० कोटीदेखील कमावले नव्हते. मात्र ‘छावा’ने पहिल्याच दिवशी ३३.१० कोटींची कमाई केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ३९.३० कोटी आणि रविवारी ४९.०३ कोटींची कमाई करत आठवड्याभरातच १०० कोटींचा पल्ला गाठला. दुसरीकडे रश्मिका मंदानाने आपली ब्लॉकबस्टर चित्रपटांची कामगिरी सुरूच ठेवली आहे. रश्मिका ही भारतातली एकमेव अभिनेत्री ठरली आहे, जिच्या नावावर ५०० कोटी कमावणारे ३ चित्रपट आहेत. एक म्हणजे ‘Animal’, दुसरा म्हणजे ‘पुष्पा २’ आणि तिसरा छावा… शिवाय, रश्मिकाने तिच्याच Animal ला मागे टाकत जिथे Animal ने दुसऱ्या आठवड्यात ५४.४५ कोटी कमावले होते तिथे ‘छावा’ने १८९ कोटी कमवत नवा रेकॉर्ड केला आहे.
===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
===============================
रेकॉर्ड्सची मालिका इथे थांबत नाही. ‘छावा’ने (Chhaava) मॅडॉक फिल्मच्याच ‘स्त्री २’चा रेकॉर्ड मोडला आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३०७.८० कोटी कमावले होते तर ‘छावा’ने २२५.२८ कोटी. पण त्यानंतर ‘छावा’ने ‘स्त्री २’ला मागे टाकत प्रत्येक आठवड्यात ‘स्त्री २’च्या कलेक्शनपेक्षा अधिक कमाई केली आहे. इतकंच नव्हे तर ‘बाहुबली २’ च्या हिंदी वर्जनने तिसऱ्या आठवड्यात ६९.७५ कोटी, ‘स्त्री २’ ने ७२.८३ कोटी कमावले होते. या दोघांचेही रेकॉर्ड मोडत ‘छावा’ने तिसऱ्या आठवड्यात ८४.९४ कोटींची कमाई केली होती. (entertainment masala)

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत चार हिंदी चित्रपट बनवले. ‘लुका छुपी’, ‘मिमी’, ‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘छावा’; हे चारही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे लक्ष्मण उतेकर हे इंडस्ट्रीत एक Brand म्हणून समोर आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘पुष्पा-२’ आणि ‘छावा’ एकाच दिवशी म्हणजेच ६ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार होते. मात्र दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी उत्तम निर्णय घेत Clash करणं टाळलं, त्यामुळे दोघांच्या पारड्यात भरगोस कमाईसोबत अनेक रेकॉर्ड्ससुद्धा पडले. दुसरीकडे दुसऱ्या विकेंडमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १८०.२५ कोटींची कमाई करणारा Chhaava हा पहिलाच हिंदी चित्रपट चित्रपट ठरला आहे.(Chhaava Box office collection)
‘छावा’ने गेल्या काही वर्षात रिलीज झालेल्या अनेक बिग बजेट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढले. Book My Show ने शेअर केलेल्या डेटा नुसार ‘छावा’च्या १० मिलियन तिकिटांची विक्री अवघ्या २० दिवसांमध्ये झाली असून यात सातत्याने वाढ होत आहे. शिवाय पुन्हा थर्ड विकेंडमध्येही छावाच Top ठरला आहे. आजपर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या Top 20 मध्ये आता छावा येऊन धडकला आहे. (Bollywood Update)
============
हे देखील वाचा :Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
============
‘छावा’ ला बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण सध्या सलमान खान आणि रश्मिका मंदानाच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाव्यतिरिक्त कोणताही मोठा चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार नाहीये. त्यामुळे २८ मार्च ‘सिकंदर’च्या रिलीजपर्यंत ‘छावा’ थिएटरमध्ये ५ आठवडे नक्कीच पुर्ण करेल. बरं, त्यातही प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद असाच मिळत राहिला तर विकी कौशलचा ‘छावा’ (Chhaava) सलमानच्या ‘सिकंदर’लाही मागे टाकण्याची शक्यता टाळता येत नाही.(Salman Khan’s Sikandar movie)
‘छावा’ ने मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट तर गाजवलं आहेच पण आता साऊथ फिल्म इंडस्ट्री गाजवण्यासाठी देखील छावा सज्ज झाला असून ‘छावा’ चित्रपट तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आला आहे. छावा चित्रपटाच्या तेलुगू वर्जनने पहिल्या दिवशी २.६३ कोटींची कमाई केली आहे. ज्या पद्धतीने तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम चित्रपट हिंदीत डब करुन मुंबई,महाराष्ट्रासह अन्य भागातील प्रेक्षकांना आकर्षित करण्याची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची स्ट्रॅटेजी आता तेलुगू प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ‘छावा’ने वापरली आहे.
याशिवाय, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये रश्मिका मंदाना हिचा मोठा चाहतावर्ग असल्यामुळेही मेकर्सने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतं. एकंदरीतच दमदार विज्युअल्स, भव्यदिव्य सेट्स, जबरदस्त कास्टिंग आणि Acting या सर्वांमुळे ‘छावा’ने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. आता छावा ६०० कोटी कमावतो का? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. (Chhaava box office collection)
रसिका शिंदे-पॉल