MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

Prasad Oak : “क्षेत्र कोणतंही असो…”; लेकासाठी मंजिरी ओकची खास पोस्ट
मराठी नाट्य, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारा दिग्दर्शक-अभिनेता प्रसाद ओक अनेक वर्ष मनोरंजसृष्टीत काम करत आहे. शिवाय, त्याची बायको मंजिरी ओक हिने देखील नवऱ्याच्या साथीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. तर आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून प्रसाद-मंजिरीचा मुलगा मयंक देखील आता दिग्दर्शन क्षेत्रात आला असून नुकतंच त्याने एका एकांकिकेचं दिग्दर्शन केलं आहे. याबद्दल मंजिरी ओकने पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या लेकाचं कौतुक केलं आहे. (Prasad Oak)
प्रसाद ओकच्या मुलाने आपलं महाविद्यालयीन शिक्षण रुईया कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. आता रुईया म्हटलं की नाट्यवलय आलंच. आणि याच नाट्यवलय मधून आपली नाटकाची आवड जपत मयंक ओक याने तक्रार ही एकांकिका दिग्दर्शित करत प्रकाशयोजनेची जबाबदारी सुद्धा सांभाळली. त्याच्या या एकांकिकेला पारितोषक देखील मिळालं असून मंजिरी ओकने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. (Marathi films update)

मंजिरी ओक (Manjiri Oak) लिहिते, “जिथून माझा आणि प्रसादचा प्रवास एकत्र सुरू झाला ती गोष्ट म्हणजे ‘एकांकिका’. क्षेत्र कोणतंही असो… पाया पक्का असायलाच हवा आणि आमच्या क्षेत्रातला पाया म्हणजे ‘एकांकिका’. आज आमच्या मयंकची सुद्धा याच क्षेत्रात येण्याची इच्छा आहे आणि त्याचा पाया सुद्धा त्याने स्वत:च भक्कम केला याचा आनंद आहे.”
पुढे ती लिहिते, “रुईया (Ruia College) महाविद्याकडून गेली ३ ते ४ वर्षे मयंक वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत होता. पण, आता कॉलेज संपत आलं असताना… लेखक शंकर पाटील यांच्या कथेतून प्रेरणा घेऊन मयंकच्या मित्रांनी एक एकांकिका लिहिली आणि मयंकने स्वतः ती एकांकिका दिग्दर्शित केली. त्याची प्रकाशयोजना सुद्धा केली. त्याच्या बाकी मित्रांनी इतर जबाबदाऱ्या सांभाळल्या. काल कॉलेज मध्येच झालेल्या स्पर्धेत मयंकच्या या एकांकिकेला प्रथम पारितोषिक, दिग्दर्शक म्हणून मयंकला आणि एकांकिकेला इतरही बरीच पारितोषिकं मिळाली. नटराजाच्या आशीर्वादाने सुरुवात तर उत्तम झालेली आहे. आता पुढचा पूर्ण प्रवास सुद्धा असाच यशस्वी होवो. याच आम्हा दोघांकडून मयंकला शुभेच्छा आणि प्रचंड प्रेम…!!!” असं मंजिरी ओकने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Entertainment masala)
===========
हे देखील वाचा : Prasad Oak प्रसाद ओकने लिहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
===========
दरम्यान, प्रसाद ओक (Prasad Oak) याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच तो ’जिलबी’ या चित्रपटात दिसला होता. तर, लवकरच तो ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातून भेटीला येणार आहे. याशिवाय, सुशीला सुजित या चित्रपटाचं तो दिग्दर्शनही करणार आहे. तसेच, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांच्या जीवनावर आधारित बायोपिकही तो घेऊन येणार आहे.