Sairat : आर्ची-परशा पुन्हा येणार भेटीला; रि-रिलीज ट्रेण्डमध्ये सैराटची वर्णी

Javed Akhtar : “हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाशी संबंध…”; जावेद स्पष्टच म्हणाले
थ्रिलर, अॅक्शन, रोमॅंटिक-कॉमेडी या पठडीतील चित्रपट अलीकडे प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. पण बॉलिवूड सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचीच कुठेतरी नक्कल करत असल्यामुळे प्रेक्षकांचा कल दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याकडे अधिक वळला आहे. परिणामी एखादा सुपरस्टार नसूनही बऱ्याच साऊथ फिल्म्स ५०० कोटींच्या पुढे कमाई करतात. यावरच दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि अभिनेता आमिर खान यांनी त्यांची मतं मांडली आहेत. नेमकं हिंदी चित्रपटांना अपयश कुठे येतं यावर जावेद काय म्हणाले जाणून घेऊयात…
गेल्या काही वर्षांत ‘जवान’, ‘पठाण’, ‘स्त्री’ यापलीकडे कोणते चित्रपट फारसे बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकले नाहीत. बरं, या चित्रपटांच्या दरम्यान इतर अनेक अभिनेत्यांचे चित्रपट येऊन गेले पण त्यांचा टिकाव फारसा लागला नाही. याबद्दल बोलताना जावेद (Javed Akhtar) म्हणाले की, “हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकांशी असलेला संबंध तुटला आहे. डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट उत्तरेत कोटींची कमाई करीत आहेत. काही दाक्षिणात्य कलाकार उत्तरेतील प्रेक्षकांना माहीतही नसतात. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतात आणि उत्तरेत त्या चित्रपटांची कमाई ६००-७०० कोटी होते.” (Javed Akhtar)

यावर आमिर खानने (Amir Khan) आपलं मत मांडता म्हटलं, “चित्रपट निर्मात्यांच्या भौगोलिक पार्श्वभूमीचा बॉलीवूडचे चित्रपट अपयशी ठरण्यामागे काहीही संबंध नाही. त्याबरोबरच दक्षिण विरुद्ध उत्तर, असाही मुद्दा नाही. आपण ज्या समस्येचा सामना करीत आहोत ती काहीतरी वेगळी आहे. आपण लोकांकडे जातो, त्यांना विनंती करतो की, कृपया आमचा चित्रपट पाहा. जर तुम्ही तो पाहिला नाहीत, तर आठ आठवड्यांत आम्ही तो तुम्हाला तुमच्या दाराशी आणून देऊ. म्हणजेच तो चित्रपट ओटीटीवर आणू. हे आपलं बिझनेस मॉडेल आहे. आठ आठवड्यांनंतर तुम्ही आधीच जे सबस्क्रिप्शन घेतलेलं असतं, त्यातून चित्रपट घरबसल्या पाहू शकता.” (Bollywood Masala)
==================
हे देखील वाचा : Amir Khan : मुन्नाभाईतून संजयला रिप्लेस करणार होता आमिर खान?
==================
पुढे आमिर म्हणाला, “माझ्याकडे आधी पर्याय नव्हता म्हणून मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचो. आता ते फॅन्सी वाटतं म्हणून मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतो. पण ओटीटीमुळे आपण कुठेही बसून कुठलाही चित्रपट पाहू शकतो. त्यामुळे थिएटरला जाण्याची गरज उरलेली नाहीये. आपण आपले स्वतःचे व्यवसाय मॉडेलच बिघडवले आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना अपयश येण्यामागे बदललेलं व्यवसाय मॉडेल हे एक कारण असूच शकतं”. (Bollywood update)

आता आगामी बिग बजेट चित्रपट हिंदीतले पाहायला गेलो तर ‘ब्रम्हास्त्र २’, ‘कल्की २’, ‘रामायण’ असे काही मोजकेच चित्रपट आहेत. पण त्यातही काही दाक्षिणात्य कलाकार गेस्ट अपिरन्स देत असल्यामुळे त्यातही थोडा साऊथ भाग दिसतोच. पण बॉलिवूडला जर का टिपिकल हिंदी चित्रपट द्यायचे असतील तर आपल्या मातीशी, संस्कृतशी आणि लोकांना आपलेसे वाटतील असे चित्रपट दिले तरच पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांना प्रेक्षक येतील. (Big budget films)