
Neena Kulkarni : ‘असेन मी… नसेन मी’ नाटकाच्या प्रयोगावेळी काय घडलं?
मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकाविश्वात ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीनीना कुळकर्णी (Neena Kulkarni) सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्वाची भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक नीना कुळकर्णी जमिनीवर पडल्या आणि सगळ्यांच्या काळजाचा टोकाच चुकला. पण तब्येत ठिक नसतानाही त्यांनी नाटकाचा प्रयोग पुर्ण सादर केल्याची माहिती संदेश कुळकर्णी यांनी दिली आहे. खरंच कामाप्रती आस्था आणि प्रेक्षकांना दिलेली वेळेची कमिटमेंट पाळून नीना कुळकर्णी यांनी आजच्या नव्या पिढीसमोर एक आदर्श तयार केला आहे. (Marathi Natak)
संदेश कुळकर्णी यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, “शिवाजी मंदिरात ८ मार्च रोजी ‘असेन मी… नसेन मी…’ (Asen Me Nasen Me) या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता. महिनादिन असल्याने नाट्यगृह महिलांनी खचाखच भरले होते. नाटक बघण्यासाठी रसिक आतुर होते, पण या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची प्रकृती बिघडली होती. पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांना अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे त्यांची (Neena Kulkarni) प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचा की नाही, या विचारात सगळे होते. मात्र त्यांनी ठामपणे ‘खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही”, अशी भूमिका घेतली.(Marathi celebrities)

नीना कुळकर्णींच्या (Needna Kulkarni) मुलीने त्यांनीप्रकृती ठिक नसल्याची माहिती संदेश कुलकर्णी यांना फोन करून दिली होती. थकव्यामुळे आणि जागरणामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यामुळे प्रयोग रद्द करायचं ठरवलं होतं, पण तरीही नीना कुळकर्णी आल्या. प्रयोगासाठी तयार होत असताना त्यांना मेकअप रूममध्ये गरगरत होतं तरीही त्यांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. (Entertainment tadaka)
नाटकाचा पहिला अंक झाला, मध्यंतराचा पडदा पडल्यावर नीनाताई रंगमंचावर कोसळल्याच, आणि तिथे उपस्थित असणारे सर्वजण घाबरले. पुढे प्रयोग करायचा नाही असं एकमताने सगळ्यांचं म्हणणं होतं, पण नीना यांनी प्रयोग पूर्ण केला. त्यांनी हिमतीने प्रयोग केला आणि हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Neena Kulkarni Movies)

नीना (Neena Kulkarni) यांनी प्रकृती बरी नसतानाही त्यांनी ‘काहीही झालं, तरी मी प्रयोग पूर्ण करेनच’, असा निश्चय केला आणि प्रयोग पूर्ण करुन दाखवलाच. नीना यांची प्रकृती आता बरी असून नाटकाचे पुढचे प्रयोग सुरू झाले आहेत, अशी माहिती देखील संदेश कुलकर्णींनी दिली आहे. (Entertainment trending news)
==========
हे देखील वाचा :Bharat Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतला ‘श्रीमंत’ कलाकार!
==========
नीना कुळकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘ध्यानीमनी’, ‘छापा-काटा’, ‘वाडा चिरेबंदी’ अशा दर्जेदार नाटकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. याशिवाय ‘सवत माझी लाडकी’, ‘आधारस्तंभ’, ‘उत्तरायण’ या मराठी चित्रपटातही उल्लेखनीय कामं केली आहेत. (Neena Kulkarni)