Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Aastad Kale : भाईंचा स्मृतिदिन ‘सुंदर’ होणार…!
‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. काही नाटकांना पुनरुज्जीवित करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना दिसत आहेत. ‘पुलं’च्या समर्थ लेखणीतून प्रकटलेलं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहे.
पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने आस्ताद काळे आणि शृजा प्रभुदेसाई ही नवी जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित करीत असलेल्या या नाटकाचा नुकताच शानदार मुहूर्त मुंबईत संपन्न झाला.
==========
हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : हसवाफसवी आणि डॉ. लागूंचं ‘ते’ पत्र!
==========
त्या त्या काळात रंगभूमीवर येऊन गेलेल्या अनेक अजरामर नाट्यकलाकृती स्मरणरंजनाच्या पुनःप्रत्ययाच्या आनंदासोबत काहीतरी विचार देऊ पाहण्याच्या उद्देशाने नव्याने रंगभूमीवर येत असतात. याच मांदियाळीतलं पु.ल.देशपांडे यांच्या लेखणीतून सजलेलं नाट्यकृतीतलं एक सुंदर पान उलगडलं जातंय याचा आनंद दिग्दर्शक राजेश देशपांडे व्यक्त करतात. (Marathi entertainment news)

==========
हे देखील वाचा : Bharat Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतला ‘श्रीमंत’ कलाकार!
==========
‘सुंदर मी होणार’ हे नाटक पु. ल. देशपांडे यांनी तीन इंग्रजी कथानकांवर आधारित लिहिले असले तरीही महाराष्ट्राच्या मराठी मातीचा एक छान गंध आणि मराठमोळेपण देऊन या नाटकाला त्यांनी अधिकच सुंदर केले आहे. कधी दृश्य तर कधी अदृश्य मानसिक पारतंत्र्याच्या बेड्या पडलेल्या आपण पाहतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी भान यावं लागतं. मला वाटतं हेच पु.ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून अधोरेखित केलं आहे. (Marathi natak news)