
Ashok Saraf : अशोक मामांनी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करण्याचं कारण सांगितलं!
मराठी चित्रपटसृष्टीचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळ ते अगदी AIचा काळ पाहणारे हरहुन्नरी आणि अष्टपैलू ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत… चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञान अवघड केल्यानंतर आत्ताचा सोशल मीडिया काळही त्यांनी आत्मसात करत काही दिवसांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर आपलं अकाऊंट सुरु केलं.. वयाच्या पंच्चाहत्तरीत सोशल मिडीया अकांऊंट सुरु केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद तर झालाच.. मुळात अशोक सराफ यांची ओळख करुन देण्याची काळी गरज नाही पण काळानुसार आपण राहायला हवं यासाठी त्यांनी आजच्या तरुणाईंच्या गळ्यातील ताईत असलेलं इन्स्टाग्राम अशोक मामांनी आपलंसं केलं आहे…

नुकत्याच लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरु का केलं याचं उत्तर दिलं आहे.. ते म्हणाले की, ““मी इतके दिवस हे अकाऊंट वगैरे सुरू करत नव्हतो कारण, मला तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे एवढे दिवस मी हे टाळत होतो. पण, म्हटलं करून पाहूयात नेमकं हे काय आहे, कसं आहे…आता ‘अशी ही जमवा जमवी’ येतोय, या चित्रपटाचं औचित्य साधत मी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलंय. माझं अकाऊंट माझी टीम सांभाळते. मला स्वत:ला त्यात फार असं काही करावंसं वाटत नाही. मी फक्त ती लोकं काय-काय करतात हे पाहत असतो.” (Ashok Saraf movies)
==============================
हे देखील वाचा: ‘मनमोही’ गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादू; Abhijeet Khandekar सोबत जुळणार लव्हकेमिस्ट्री!
==============================
दरम्यान, बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटात पुन्हा एकदा वंदना गुप्ते आणि अशोक सराफ एकत्र दिसणार आहेत…‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून यात चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.(Marathi movies)