Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Veer Murarbaji Movie: ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र; छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत झळकणार…

 Veer Murarbaji Movie: ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र; छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत झळकणार…
Veer Murarbaji Movie
मिक्स मसाला

Veer Murarbaji Movie: ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र; छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत झळकणार…

by Team KalakrutiMedia 05/04/2025

Veer Murarbaji Movie: प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवली आहे. या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या दोघांचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी  हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.(Veer Murarbaji Movie)

Veer Murarbaji  Movie
Veer Murarbaji Movie

ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघे सांगतात. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत या दोघांनी व्यक्त केलं.   

===============================

हे देखील वाचा: Aishwarya Rai Bachchan च्या बॉडीगार्डचा पगार माहितेय का? आकडा ऐकून तुमचे ही डोळे विस्फारतील

===============================

1665 च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे अवघ्या सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. त्यांनी ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमानं मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी, या उद्देशाने ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ हा चित्रपट घेऊन येत असल्याची माहिती निर्माते अजय आरेकर यांनी दिली आहे.(Veer Murarbaji Movie)

================================

हे देखील वाचा: Manoj Kumar Death: ‘तीन आवडत्या गोष्टी’ घेऊन मनोज कुमारच्या घरी पोहचली रविना टंडन, म्हणाली ‘माझ्या वडिलांना त्यानी….’ 

================================

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत असून  लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: arun govil Celebrity chhatrapati shahajiraje bhosale deepika chikhalia Entertainment Marathi Movie rajmata jijau veer murarbaji veer murarbaji hindi movie veer murarbaji movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.