
Akshaye Khanna ‘छावा’ गाजवल्यानंतर अक्षय खन्नाची साऊथमध्ये एन्ट्री!
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने थिएटरमध्ये यशस्वीरित्या ५१ दिवसस पुर्ण करत नवा इतिहास रचला आहे. २०२५ या वर्षात विकी कौशल 9Vicky Kaushal) अभिनित ‘छावा’ हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला. इतकंच नाही तर विकी कौशल आणि औरंगजेब ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्या आयुष्यातही ‘छावा’ हा चित्रपट फार महत्वाचा ठरला. या चित्रपटात अक्षयने औरंगजेब साकारल्यानंतर त्यावरुन वादंग निर्माण झाला होता. पण आता बरीच वर्ष काम केल्यानंतर अक्षयने साऊथ इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे. (Akshaye Khanna)
‘हनुमान’ (HanuMan) हा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर प्रशांत वर्मा पहिल्यांदाच फिमेल सुपरहिरो फ्रॅंचायझी असलेला ‘महाकाली’ (Mahakali) हा चित्रपट घेऊन येणार आहे. आणि याच चित्रपटातून अक्षय खन्ना इतर बॉलिवूडच्या कलाकारांपाठोपाठ आपली तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय कारकिर्द सुरु करणार आहे. अद्याप अक्षय खलनायकाच्या की नायकाच्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट करण्यात आले नाही.(Bollywood news)

‘महाकाली’ चित्रपटाबद्दल हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘मुख्य भूमिकेत कोणाला घ्यायचे याबाबत प्रशांत खूप उत्सुक आहे, कारण प्रशांत यांचा हा पहिला महिला सुपरहिरो चित्रपट असेल आणि त्यासाठी एका खास टीमची आवश्यकता आहे. लवकरच इतर तांत्रिक बाबी पुर्ण करुन चित्रपट अधिकृतपणे सुरू होईल. (South Film Industry)

पीव्हीसीयूची (प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स) सुरुवात गेल्या वर्षी ‘हनुमान’ या अभिनेता तेजा सज्जादच्या सुपरहिरो चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाने तेलुगूसह बॉलिवूडलाही भूरळ घातली होती. भगवान हनुमान यांच्या पौराणिक अवताराने प्रेरित झालेल्या पात्रावर आधारित चित्रपटाचं कथानक होतं.(Bollywood tadaka)
‘जय हनुमान’ या नावाने सुपरहिरोंच्या या युनिव्हर्सचा आणखी एक चित्रपट तयार केला जात आहेच. तसेच,या सुपरहिरो फ्रँचायझीला पुढे नेत आता देवी कालीवर आधारित ‘महाकाली’ हा चित्रपट या युनिव्हर्सचा एक भाग असणार आहे. यासोबतच ‘अधिरा’ हा आणखी एक चित्रपट या फ्रॅंचायझीमधला असून त्यात भगवान इंद्रावर आधारित एक पात्र असेल. (Entertainment Masala)
===========================
हे देखील वाचा: Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी मिळाली?
==========================
दरम्यान, जसं अॅनिमल चित्रपटाच्या यशानंतर बॉबी देओलला साऊथ कडून चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. अगदी तसंच काहीसं अक्षय खन्नाच्या बाबतीत झाल आहे. १९९७ मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटापासून त्याच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाल होता. अक्षयचे वडिल विनोद खन्ना सुपरस्टार असल्यामुळे अभिनयाचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं. पण वडिलांच्या ताकदीचा अभिनय अक्षय करु शकला नाही असं म्हटलं गेलं. पण तरीही ‘ताल’, ‘बॉर्डर’, ‘कुदरत’, ‘दिल चाहता है’, ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘दीवार’, ‘आक्रोश’, ‘दृश्यम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Akshaye Khanna films)