
Kon Hotis Tu Kay Jhalis Tu मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण
Star Pravah वर २८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव नव्या रुपात भेटीला येणार आहेत. मालिकेच्या कथानकाविषयी दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुलींना स्वरक्षण हे यायलाच हवं आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवं या मताची असणारी कावेरी गावातल्या इतर मुलींनाही स्वरक्षणाचे धडे देते.(Actress Girija Prabhu)

या भूमिकेसाठी गिरीजा जवळपास महिन्याभरापासून लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतेय. काठी कशी पकडायीच इथपासून सुरु झालेला गिरीजाचा प्रवास आता काठीचा उपयोग करुन स्वरक्षण कसं करायचं इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.गिरीजाला नृत्यकला उत्तमरित्या अवगत आहेच. या मालिकेच्या निमित्ताने गिरीजा लाठीकाठीही शिकली. या अनुभवाविषयी सांगताना गिरीजा म्हणाली, ‘लाठीकाठी हा महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक खेळ आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ प्रचलित आहे. स्वसंरक्षण हा मुख्य हेतू असलेला हा खेळ शारिरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. लाठीकाठीचं हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतं नाही तर आयुष्यभर माझ्यासोबत राहिल. ही कला प्रत्येकाने शिकायला हवी असं यानिमित्ताने मी आवाहन करेन. मी अवगत केलेली ही कला मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू २८ एप्रिलपासून रात्री ८ स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.(Actress Girija Prabhu)
========================================
========================================
या मालिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता मंदार जाधव ही (Actor Mandar Jadhav) नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू या नव्याकोऱ्या मालिकेत मंदार यश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मधील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. महाराष्ट्राची ही लोकप्रिय जोडी कोण होतीस तू, काय झालीस तू या नव्या मालिकेतून कावेरी आणि यशच्या रुपात पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे