
Ashok Saraf : “मैत्री असणारा नट असेल तर…”; वंदना गुप्ते काय म्हणाल्या?
कलाकार म्हणून अशोक सराफ किती श्रेष्ठ आहेत हे आपण सगळेच जाणतो. नुकताच त्यांचा अशी ही जमवाजमवी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत बऱ्याच वर्षांनंतर वंदना गुप्तेंनी स्क्रिन शेअर केली आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून वंदना गुप्ते यांनी एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांयासोबतच्या मैत्रीबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. नेमकं काय म्हणाल्या वंदना गुप्ते? वाचा… (ashok saraf)

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana gupte) यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या. घरातूनच कलेचा वारसा लाभल्यामुळे मनोरंजनसृष्टीत आपलं स्थान त्यांनी निर्माण केलं. सध्या अशी ही जमवाजमवी या चित्रपटामुळे वंदना गुप्ते चर्चेत असून राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, “अशोक माझ्या मोठ्या बहिणीचा भारतीचा मित्र आहे. त्यांनी नाटकांत एकत्र काम केलं होतं. नाटकांत काम करताना कलाकारांना एकमेकांचा सहवास जास्त मिळतो. माझा आणि अशोकचा संबंध हा नाटकांमुळे नाही, तर काही चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र काम केल्यामुळे आला”. (Entertainment masala)

पुढे त्या म्हणाल्या की, “अशोक हा माणूस नट म्हणून श्रेष्ठ आहेच; पण माणूस म्हणूनही श्रेष्ठ आहे. या दोन्ही गोष्टींचं चांगलं कॉम्बिनेशन असणारी फार कमी लोकं इंडस्ट्रीमध्ये असतात. आपला मोठेपणा घेऊन मिरवणारे खूप आहेत. पण, मोठा असूनही आपलं माणूसपण आणि मैत्री जपणारा असा अशोक आहे. माझी आणि अशोकची निवेदितामुळे (Nivedita Saraf) दोस्ती जमली. आमच्यातील बॉण्डिंग खूप छान आहे. मैत्रीच्या पलीकडे जाऊन एक वेगळा बॉण्ड तयार होतो, तसं आमच्यात बॉण्डिंग आहे”.(Entertainment news)
===============================
हे देखील वाचा: KKHH : जावेद अख्तर यांनी शाहरुखच्या चित्रपटाची गाणी लिहण्यास का दिला होता नकार?
===============================
आपल्या मैत्रीच्या बॉंडिंगबद्दल अधिक बोलताना शेवटी त्या म्हणाल्या की, “त्याला आवडतं की नाही माहीत नाही, मी मस्ती करते. छान मैत्री असलेला उत्तम नट जर आपल्याला मिळाला, तर त्याचा आपल्या करिअरला फायदा होईल. या स्वार्थी भावनेनेसुद्धा मी त्याच्याशी मैत्री टिकवली आहे”. (Vandana Gupte And Ashok Saraf)
अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी यापूर्वी ‘तुझी माझी जमली जोडी’, ‘आंधळी कोशिंबीर’ आणि ‘लपंडाव’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. माणिकबाई वर्मा यांच्याकडून उपजत आलेली कला वंदना गुप्ते आणि त्यांच्या बहिणींनी जपलं आहे. (Marathi Films)