
Naagzilla: करण जोहर प्रेक्षकांना नेणार सापांच्या नगरीत; ‘हा’ सुपरस्टार साकारणार नागदेवता
करण जोहर यांनी सध्या ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपटाची निर्मिती केली असल्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हलक्या फुलक्या चित्रपटांचे विषय हाताळणाऱ्या करण जोहरने देशावर आधारित चित्रपटाची निर्मिती केल्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे. आता केसरी २ नंतर करण जोहरने आगामी चित्रपटाची घोषणा केली असून सापाची अनोखी नगरी ते ‘नागझिला’ (naagzilla) चित्रपटातून प्रेक्षकांना दाखवणार आहेत. (Karan Johar movies)

‘नागझिला’ चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं असून बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) या चित्रपटात झळकणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार ‘नागझिला’ सिनेमात कार्तिक दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक पहिल्यांदाच नायक आणि खलनायक या दुहेरी भूमिका निभावणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत असून या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि महावीर जैन यांनी केली आहे.(Bollywood movie update)
==========
हे देखील वाचा : Kartik Aaryan : ‘चंदू चम्पियन’ चे हक्क ‘या’ अभिनेत्याने आधीच घेतले होते विकत!
==========
‘नागझिला’चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू होणार असून २०२६ मध्ये नागपंचमीच्या मुहुर्तावर १४ ऑगस्ट २०२६ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल असं सांगण्यातक आलं आहे. दरम्यान, ‘नागझिला’ हा चित्रपट साप आणि माणसाच्या संघर्षावर आधारित विनोदी कथा असून कार्तिक आर्यन दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारणार आहे. तसेच, दुहेरी भूमिका असल्यामुळे चित्रपटात तो दोन अभिनेत्रींसोबत झळकणार आहे. त्यामुळे ‘भूल भूलैय्या ३’ नंतर कार्तिकच्या या चित्रपटासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. (Entertainment news)