Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र भाऊ असता”

 Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र भाऊ असता”
मिक्स मसाला

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र भाऊ असता”

by रसिका शिंदे-पॉल 13/05/2025

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) फार लवकरच सिनेसृष्टीतून गेल्या. अतिशय कमी काळासाठी खरं तर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलं पण जितक्या भूमिका किंवा चित्रपट केले ते आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहेत. स्मिता पाटील यांनी अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. ७० च्या दशकात स्मिता यांनी शबाना आझमी यांच्यासोबत काम केलं आहे. इतकंच नाही तर या दोन्ही अभिनेत्रींमध्ये स्पर्धा देखील पाहायला मिळाली होती. मात्र, सहकलाकार असूनही त्यांच्यात घट्ट मैत्रीदेखील होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक याने शबाना आझमींबद्दल एक रंजक माहिती सांगितली आहे. (Entertainment)

प्रतीक स्मिता पाटील (Smita Patil) याने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, “मला अलीकडच्या काळात समजले की माझ्या आईच्या निधनानंतर शबाना आझमी (Shabana Azmi)  आणि जावेद अख्तर (Javed Akhtar)  यांना मला दत्तक घेण्याची इच्छा होती. पण, ते थोडे गुंतागुंतीचं होतं. मात्र, तर का तसं झालं असतं तर आज मी फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) सावत्र भाऊ असतो. कधी कधी मी विचार करतो कीजर जावेद अख्तर व शबाना आझमी यांनी मला दत्तक घेतलं असतं, तर आज माझं आयुष्य कसं असतं माहीत नाही.”(Bollywood trending news)

पुढे प्रतीक म्हणाला की, “माझ्या लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. माझ्या आईबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम होतं. माझ्या आईला जे प्रेम मिळालं, त्याबद्दल खरंच मी कृतज्ञ आहे. आईबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल सद्भावना होत्या आणि शबानाजी त्यापैकी एक होत्या. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही खूप प्रेम आणि पाठिंबा दिला होता. मला वाटतं की आईबरोबर ज्या दिग्गज कलाकरांनी काम केलं ते सर्वच कलाकार मग नसिरुद्दीन साहेब (Naseruddin Shah) , रत्ना पाठक, श्याम बेनेगल हे सर्वच कलाकार खूप चांगले आहेत, तो काळच वेगळा होता”.(Bollywood old movies)

================================

हे देखील वाचा: Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!

=================================

दरम्यान, स्मिता पाटील यांच्या कामाबद्दल खरं तर विशेष ओळख करुन देण्याची गरज नाही. त्यांनी ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’, ‘सामना’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘आक्रोश’, ‘बाजार’, ‘अर्थ’, ‘नमक हलाल’, ‘आज की रात’, ‘गिध’, ‘तरंग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली. (Smita Patil movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood masala bollywood update Celebrity News Entertainment farhan akhtar Javed Akhtar prateik babbar Prateik Smita Patil raj babbar Shabana Azmi Smita Patil
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.