लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Amitabh Bachchan : अँग्री यंग मॅन, जंजीर आणि बरंच काही…
अमिताभ बच्चन यांच्या ’अॅंग्री यंग मॅन’ या इमेजला जन्म देणारा सिनेमा म्हणजे प्रकाश मेहरांचा ११ मे १९७३ साली प्रदर्शित झालेला ’जंजीर’. (या घटनेला ५२ वर्षे पूर्ण झाली.) हा सिनेमा अमिताभ यांना कसा मिळाला? कारण तोवर त्यांच्या डझनभर फ्लॉप सिनेमाची मालिका बनली होती. जे दोन सिनेमे हिट झाले होते त्यात अमिताभ पेक्षा इतरांच क्रेडीट अधिक होतं. (आनंद- राजेश , बॉम्बे टू गोवा – मेहमूद) ’जंजीर’या सिनेमाच्या मेकींगची कथा फारच इंटरेस्टींग आहे. (Making of Zanjeer movie)

सलीम जावेद हि लेखक द्वयी धर्मेंद्र यांच्याकडे हा विषय घेऊन आले. धर्मेंद्र व प्रकाश मेहरा त्या वेळी एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एकत्र आले होते. धर्मेंद्र यांना कथानक आवडले पण त्याच वेळी प्रकाश मेहरा यांच्याकडे देखील पं मुखराम शर्मा यांच्या कथेचं स्क्रीप्ट होतं. धरमला सलीम जावेद पेक्षा शर्मांचे कथानक आवडले. त्यांनी लगेच याच कथेवर काम करण्याचे ठरवले आणि ’समाधी’ या सिनेमाचे शूट चालू झाले. त्यात धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. त्यामुळे जंजीरचे कथानक मागे पडले पण या सिनेमात तेच काम करणार व त्या सिनेमाचा निर्माताही बनणार हे नक्की झालं. (Bollywood inside stories)
मात्र, त्याच काळात के ए नाराय़ण यांच्या एका स्टोरीवर अर्जुन हिंगोरानी (जे धरमचे गॉडफादर होते) यांनी धर्मेंद्रला घेऊन ’कहानी किस्मत की’ या सिनेमाची तयारी सुरू केल्याने ’जंजीर’चं प्रोजेक्ट आणखी मागे मागे पडत गेलं. प्रकाश मेहरांचा ’समाधी’ प्रदर्शित झाला आणि हिट झाला. आता त्यांनी धर्मेंद्र यांच्याकडे पुन्हा हा विषय काढला. पण त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांना अजिबात वेळ नव्हता. शेवटी बर्याच चर्चेनंतर मेहरांना शुभेच्छा देत धर्मेंद्र यांनी सिनेमाचा हट्ट व हक्क सोडला.(Amitabh Bachchan movies)

आता प्रकाश मेहरांनी नायकाचा शोध सुरू केला. या भूमिकेसाठी त्यांनी देव आनंद यांना गाठले. राज खोसलाच्या ’काला पानी’तील त्यांच्या भूमिकेनं मेहरा प्रभावित झाले होते. देव यांना स्क्रिप्ट आवडलं फक्त त्यात ३-४ रोमॅंटीक गाणी टाकली तर मी करेन असा निरोप पाठवला.मेहरा यांनी अर्थातच नकार दिला. तेव्हा देव यांनी दुसरं प्रपोजल दिलं ज्यात हा सिनेमा नवकेतनच्या बॅनर खाली बनवला जाईल व दिग्दर्शन मेहराच करतील. मेहरांनी या ऑफरला देखील नकार दिला ; कारण त्यांना साचेबध्द नायकाची इमेज या सिनेमात बदलायची होती. नायकाचा शोध चालूच होता.मेहरांनी मग राजकुमार यांना विचारले.जानी त्या वेळी मद्रासला ’दिल का राजा’चे शूटींग करीत होते त्यांनी जर ‘जंजीर’ मद्रासलाच शूट करणार असेल तरच काम करण्याची तयारी दर्शवली.(काही प्रसार माध्यमांनी प्रकाश मेहरांनी केसाला चोपडलेल्या तेलाचा उग्र वास राजकुमारला आवडला नाही म्हणून या सिनेमाला त्याने नकार दिल्याचे सांगितले!!) (Bollywood tadaka)
================================
हे देखील वाचा: Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!
=================================
मेहरांना सर्वांकडून नकार घंटा मिळत होती.याच काळात त्यांची भेट अभिनेते प्राण यांच्याशी झाली. प्राण यांनी अमिताभ यांचे नाव सुचवले व त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ’बॉम्बे टू गोवा’ हा सिनेमा पाहाण्याचा सल्ला दिला.लगेच दुसर्या दिवशी मेहरा व सलीम जावेद हा सिनेमा बघायला गेले.ताडमाड उंचीचा काटकुळा अमिताभ प्रथम दर्शनी त्यांना काही आवडला नाही पण शत्रुघ्न सिन्हा सोबतचे त्यांचे फाईट सीन व डोळ्यातला अंगार त्यांना आवडला.आणि अमिताभला घेऊन जुगार खेळण्याचा त्यांचा निर्णय झाला.पण प्रश्न इथे संपले नाहीत. (Bollywood masala)

अमिताभ यांना ‘जंजीर’चा नायक म्हणून घेतल्यावर नायिकेचा शोध सुरू झाला.आधीच्या ठरलेल्या प्रोजेक्टनुसार धर्मेंद्र यींची नायिका मुमताज असणार होत्या. मेहरा त्यांच्याकडे अप्रोच झाले त्या वेळी त्यांनी होकार कळविण्यासाठी थोडा वेळ मागितला. मेहरा गोंधळले.हा काय प्रकार आहे ? तो वर त्यांच्या नावावर तीन हिट सिनेमे (हसीना मान जायेगी,मेला,समाधी) जमा होते. मुमताजच्या वेळ काढू्पणाचे कारण वेगळेच होते. त्या ओ पी रल्हन यांच्या ’बंधे हाथ’ या सिनेमात नुकतीच अमिताभची नायिका म्हणून काम करत होत्या. अमिताभ सोबत काम करून आणखी एका फ्लॉपचे धनी होण्यापेक्षा सिनेमा करता नकार देणं त्यांनी पसंत केलं.पण नकाराचे कारण त्यांनी लंडन स्थित उद्योगपती मयुर वाधवानी सोबत होणारं लग्न व त्याकरीता हातातील प्रोजेक्ट संपविण्याची घाई हे दिलं!(Entertainment news)
अमिताभ यांना हे सारं समजत होतं.ते दु:खाने प्रकाश मेहरांना म्हणाला ’लल्ला, अगर मेरी ये फिल्म भी पीट गई तो मैं सब बोरीया बिस्तर बॉंधके अलाहाबाद चला जाऊंगा!’ पण एक व्यक्ती होती जिला अमिताभ व या स्क्रिप्ट वर पूर्ण विश्वास होता ती म्हणजे प्राण! प्राण यांनी अमिताभ आणि मेहरा या दोघांना धीर दिला.त्यांनी स्वत: या सिनेमाकरीता ’शोर’ मधील भूमिकेचा त्याग केला.नायिकेचा शोध चालूच होता.(Entertainment)

’समाधी’त जया भादुरी काम करीत होत्या. त्यांनी अमिताभ सोबत ‘बन्सी बिरजू’, ‘प्यार की कहानी’ व ‘एक नजर’ या सिनेमात नायिकेची भूमिका केली होती व तिन्ही सिनेमे फ्लॉप ठरले होते.अमिताभ यांनी जयाला या सिनेमात माझ्यासोबत काम करायला कुणीही तयार नाही तू नायिकेची भूमिका करशील कां? असा निरोप पाठविला.अमिताभच्या अभिनयाची ताकत जयाने ओळखली होती.हा एक निद्रीस्त ज्वालामुखी आहे याची त्यांना कल्पना होती.संधी मिळत नसल्याने त्यांच्यातील कलावंताची घुसमट होते आहे याची त्यांना जाणीव होती.जया यांनी होकार दिला व सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले.(Bollywood)
===============
हे देखील वाचा : Amol Palekar : अभिनेता अमोल पालेकर ‘यांच्या’विरुध्द कोर्टात का गेले होते?
===============
पहिला मूहुर्ताचा शॉट प्राण वर ’यारी है इमान मेरा’ या कव्वालीच्या प्रसंगाचा होता.सिनेमाच्या क्षेत्रातील लोकं, फायनान्सर, वितरक सारे जण प्रकाश मेहरांच्या या प्रोजेक्टला हसत होते. सिनेमात नायकाला गाणी नाहीत,तो नाचत नाही , नायिके सोबत रोमान्स नाही ’मेहरा साब सठीया गये क्या? वो लंबू को लेके क्या दिवाला निकालवाना चाहते हो?’ असे कुत्सित टोमणे मारत होते.पण सर्वांनी आपला तोल ढळू दिला नाही.लोकं जितके टिका करीत होते तितके हे स्ट्रॉंग होत होते.मनोज कुमार यांनी मेहरांना स्वत:चं प्रॉडक्शन सुरू करून त्या बॅनर खाली हा सिनेमा बनविण्याचा सल्ला दिला.व त्याच वेळी अमिताभ यांवा स्वत:च्या ’रोटी कपडा और मकान’ करता साईन करून त्यांच्यावर विश्वास दाखविला. (latest entertainment news)

सिनेमात अजित (तेजा) व बिंदू (मोना डार्लींग) यांच्या भूमिका जबरदस्त होत्या. अमिताभ यांच्या आतील उर्जेला प्रथमच एवढे मोठे एक्स्पोजर मिळालं.एका नव्या युगाची नांदी झाली. एक नवा अनभिषिक्त सम्राट जन्माला आला. अपयशाला संधी आणि अपमानाला ताकत समजून त्यांनी पुढे मोठे साम्राज्य उभे केले. ’जंजीर’ व ’बॉबी’ प्रदर्शित झाले व दोन्ही सुपर हीट ठरले. अमिताभ यांच्या आजच्या ग्लॅमर पुढे सर्व जण हरखून जातात. पण अभिनयाचे हे उत्तुंग शिखर गाठतानाचा त्यांचा प्रवास, तिथला संघर्ष,अपयश ,अपमान आजच्या पिढीला कळावेत म्हणून केलेलं हे स्मरण!(Celebrities news)