आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका
पल्लवी जोशी (Pallavi joshi) या भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी करिअरमध्ये त्यांनी टेलिव्हिजनपासून चित्रपटांपर्यंत विविध माध्यमांतून काम केलं आहे आणि आज त्या एक प्रभावशाली चित्रपट निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या भूमिकांमधील सखोल समज आणि प्रभावी सादरीकरणासाठी पल्लवी जोशी यांना ओळखले जाते. लवकरच पल्लवी जोशी एका नव्या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत. (Bollywood)

‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’सारख्या चित्रपटांमधून भरघोस यश मिळवल्यानंतर पल्लवी जोशी आता त्यांच्या आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मिडिया हँडलवरून पल्लवी जोशी यांचं कॅरेक्टर पोस्टर शेअर केलं असून या चित्रपटात त्या विद्या रैना ही भूमिका साकारणार आहेत. (Tanvi the great)
==========
हे देखील वाचा : ‘या’ कपूरने आर के फिल्म्स मध्ये काम करायला दिला नकार
==========
पल्लवी जोशी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. ‘अमृत’, ‘मुजरिम’, ‘सुपर नानी’, ‘झूठी शान’, ‘पनाह’, ‘द ताशकंत फाईल्स’, The Vaccine War अशा अनेक चित्रपटांमध्ये पल्लवी जोशी विविधांगी भूमिकांमध्ये दिसल्या आहेत. (Pallavi joshi movies)