Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Raj Thackeray : ‘त्या’ रात्री निलेश साबळेला राज ठाकरेंचे १७

Shammi Kapoor : ‘रफी शिवाय माझं रुपेरी आयुष्य शून्य आहे’

Bollywood Movies 2025 : जुलै महिना चित्रपटांचा महाउत्सव; एकाच दिवशी

Ashutosh Rana : “भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही”; मराठी-हिंदी

Siddharth Malhotra-Kiara Advani यांना झालं कन्यारत्न; सिद्धार्थने पोस्ट करत दिली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sundar Mi Honar Natak: पु.ल.देशपांडे यांचं नाटक ३० वर्षांनी रंगभूमीवर येणार!

 Sundar Mi Honar Natak: पु.ल.देशपांडे यांचं नाटक ३० वर्षांनी रंगभूमीवर येणार!
Sundar Mi Honar Marathi Natak
नाट्यकला मिक्स मसाला

Sundar Mi Honar Natak: पु.ल.देशपांडे यांचं नाटक ३० वर्षांनी रंगभूमीवर येणार!

by Team KalakrutiMedia 27/05/2025

मराठी साहित्यात पु.ल.देशपांडे यांचं अमुल्य योगदान आहे. त्यांच्या लिखाणातून अनेक अजरामर कलाकृती घडल्या. लवकरच त्यांनी लिहिलेलं नाटक तब्बल ३० वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमी गाजवणार आहे. सुंदर मी होणार हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात पाहायला मिळणार आहे. महाराजांचा जावई म्हणजेच सुरेश या गायकाच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते अमोल बावडेकर दिसणार आहेत. (Sundar Mi Honar Marathi Natak)

Sundar Mi Honar Marathi Natak
Sundar Mi Honar Marathi Natak

पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल ३० वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १२ जूनला देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहेत.

Sundar Mi Honar Marathi Natak
Sundar Mi Honar Marathi Natak

‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा विषय हा भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा आहे. भारतातील राजघराणी, संस्थाने पूर्णपणे खालसा  झाल्यानंतरच्या बदलाचा सर्वांना जबरदस्त फटका बसला होता. काहींनी काळाप्रमाणे स्वतःला बदलून घेतले, तर काहींनी सत्ता नसताना सुद्धा त्याच तोऱ्यात, अवेशात राहणे कवटाळले होते. पु.ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून आपल्या लेखन समर्थ्याने अधोरेखित केलं आहे.

===================================

हे देखील वाचा: Chidiya Hindi Movie: सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासाठी ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग !

===================================

नाटकात आस्ताद काळे, स्वानंदी टिकेकर, श्रुजा प्रभुदेसाई, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर यांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत मिलिंद जोशी यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. नाटकाचा पुण्यातील शुभारंभ १२ जून या दिवशी होणार असून मुंबईत १३ जून आणि नाशिक येथे २२ जून असे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhijeet Chavan Amol Bawdekar astad kale Entertainment pu la deshpande Shruja Prabudesai Shruti Patil Srujan Deshpande Sundar Mi Honar Marathi Natak Svanandi Tikekar Virajas Odhekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.