DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

Housefull 5 : नाना पाटेकरांनी पत्रकाराची घेतली फिरकी म्हणाले, “प्रश्न इंग्रजीत नाही तर….”
साधी राहणी पण अभिनयात टॉपचा दर्जा देणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar). नायक, खलनायक आणि विनोदी भूमिका ताकदीने सादर करणारे नाना पुन्हा एकदा विनोदाचा एक वेगळाच पैलु प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटात नाना मराठमोळ्या अंदाजात दिसणार असून नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे जरी अद्याप समजलं नसलं तरी अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) परत त्यांच्या विनोदाची बॅटींग प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नुकताच ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. नानांची ओळख जितकी अभिनयासाठी आहे तितकीच त्यांच्या परखड बोलण्यासाठीही आहे. या कार्यक्रमात पुन्हा एकदा नानांनी सडेतोड उत्तर देत प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला होता.(Bollywood update)

मल्टी स्टारर ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला रितेश देशमुखपासून अभिषेक बच्चनपर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांनी कलाकारांना प्रश्न विचारले होते. एका पत्रकाराने नाना पाटेकरांना इंग्रजीत प्रश्न विचारला असता, नानांनी त्याला उत्तर देत म्हटलं की, “इंग्रजी येत नाही, हिंदीमध्ये विचार”. नानांचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर नाना जॅकलिन फर्नांडिसची देखील फिरकी घेताना दिसले.(Bollywood masala)

दरम्यान, ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात १८ कलाकार आहेत. ज्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाकरी, चित्रगंधा सिंग, डिनो मोरिया अशी तगडी फौज चित्रपटात आहे.(Housefull 5 movie cast)
================================
हे देखील वाचा: Dada Kondke आणि डॉन हाजी मस्तान यांच्या मैत्रीचे किस्से माहित आहे का?
=================================
नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आजवर विविध भूमिका करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. मुळात नाटकात रमणाऱ्या नानांना स्मिता पाटील (Smita Patil) यांनी हात धरुन चित्रपटांमध्ये आणलं. मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छा नसणाऱ्या नानांनी आज जगभरात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. आजही नाना पाटेकरांची ‘वेलकम’ (Welcome) चित्रपटातील उदय शेट्टी ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडते. तर ‘तिरंगा’ चित्रपटात त्यांनी साकारलेला शिवाजीराव वागळे एक वेगळाच ठसा उमटवून गेला आहे. आता हास्याचा स्फोट आणि मर्डर मिस्ट्री असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) मध्ये नेमकं नाना कोणतं पात्र साकारणार याचा उलगडा ६ जून २०२५ रोजी होणार आहे.(Bollywood movies release date)