Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री

Abhishek Bachchan : “तुझ्या वडिलांना इथून जायला सांग”, बिंग बींना बोलणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?
बॉलिवूड इंडस्ट्री जगभरात एका नावामुळे विशेष ओळखली जाते ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). खरं तर पहिला चित्रपट मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या अमिताभ यांना आता दिग्दर्शक किंवा निर्माते आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपड करतान दिसतात. वय वर्ष ८२ असूनही बिग बी आजही लिड रोल करताना दिसतात. आता जरा का तुम्हाला असं सांगितलं की आताच्या नावाजलेल्या एका अभिनेत्रीने चक्क अमिताभ बच्चन यांना सेटवरुन जायला सांगितलं होतं तर ते पटेल का? पण हो असा किस्सा घडला होता आणि चक्क त्या अभिनेत्रीने अभिषेक बच्चनलाच (Abhishek Bachchan) त्याच्या वडिलांना सेटवरुन जायला सांग असं म्हटलं होतं… काय होता हा किस्सा जाणून घेऊयात… (Bollywood gossip)

सध्या अभिषेक बच्चन ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. मल्टी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटात सगळेच कलाकार हास्याचा स्फोट घडवून आणणार यात शंका नाही. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने २००० साली आलेल्या ‘रेफ्युजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता. त्याआधी ‘आखरी मुघल’ हा चित्रपट येणार होता जो खरं तर अभिषेकचा पहिला डेब्यू चित्रपट ठरणार होता. यात बिपाशा बासू (Bipasha Basu) त्याची नायिका असणार होती आणि अभिषेक दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या मुलाची भूमिका करणार होता. झालं असं की, अभिषेकचा हा पहिला चित्रपट असल्यामुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्याचं काम कसं सुरु आहे हे पाहण्यासाठी सेटवर येत असत. त्यावेळी बिपाशा बासू त्यांना पाहून घाबरली आणि तिने अभिषेकला तुझ्या वडिलांना सेटवरुन जायला सांग असं थेट सांगितलं. (Bollywood news)

अभिषेक बच्चन यावर बिपाशाला म्हणाला की, “ते माझे वडिल आहेत मी त्यांना इथून जा असं कसं सांगू शकतो? ?”. त्यामुळे ‘आखरी मुघल’ या चित्रपटाच्या शुटींगवेळी बिपाशा अस्वस्थच असायची. याशिवाय चित्रपटाच्या पटकथेत काहीतरी कमतरता होती असं जाणवल्यामुळे दिग्दर्शक जेपी दत्ता यांना वाटलं की, चित्रपट बनवला तरी तो फ्लॉप होऊ शकतो आणि त्यामुळे चित्रपटाचं शुटींग थांबवण्यात आलं.(Entertainment news)
================================
=================================
मुळात अभिषेक बच्चन सोबत ‘आखरी मुघल’ (Aakhri Mughal) या चित्रपटात बिपाशा बासू हिने नायिका असावं असं जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी दत्ता यांना सूचवलं होतं. मात्र, हा चित्रपट तयार न होऊ शकल्यामुळे अभिषेक बच्चनचा ‘रेफ्युजी’ (Refugee) हा पहिला चित्रपट तर बिपाशा बासूचा ‘अजनबी’ (Ajnabee) हा डेब्यू चित्रपट ठरला. बिपाशा बासू सध्या चित्रपटांपासून लांब असली तरी तिचा एकेकाळचा सहकलाकार असणारा अभिषेक बच्चन वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये काम करताना दिसतोय. येत्या काळात अभिषेक बच्चन ‘हाऊसफुल्ल ५’, ‘राजा शिवाजी’, ‘किंग’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.(Abhishek Bachchan Movies)