Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Laughter Chefs 2 ला रिप्लेस करायला येतोय ‘हा’ शो
Colors TV वर लवकरच एक नवीन नॉन-फिक्शन रिअॅलिटी शो प्रीमियर होणार आहे ज्याचं नाव आहे ‘पति, पत्नी और पंगा – जोड्यांचा रिअॅलिटी चेक’. हा शो खास सेलिब्रिटी कपल्सवर आधारित असेल जिथे त्यांच्या खऱ्या आयुष्याची झलक आणि एकमेकांशी असलेली केमिस्ट्री दिसणार आहे. या शोमध्ये हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जायसवाल तसेच अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्यांची पत्नी देबिना बनर्जी यांसह अनेक प्रसिद्ध जोड्या सहभागी होतील. (Pati Patni Aur Panga New Show)

‘पति, पत्नी और पंगा’ हा शो ‘लाफ्टर शेफ्स’च्या दुसऱ्या सिझनची जागा घेणार आहे. दरवर्षी या वेळेस कलर्सवर रोहित शेट्टीच्या प्रसिद्ध ‘खतरों के खिलाड़ी’ चा १५ वा सिझन सुरू होण्याची अपेक्षा असते. पण अद्याप काही अपडेट न आल्यामुळे ‘पति, पत्नी आणि पंगा’ची घोषणा केली आहे.अनेक माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, ‘खतरों के खिलाड़ी’ १५ शो कदाचित कायमच बंद करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.

‘पति, पत्नी और पंगा’ मध्ये हिना खान आणि रॉकी जायसवाल, गुरमीत चौधरी आणि देबिना बनर्जी, कॉमेडियन सुदेश लहरी आणि त्यांची पत्नी , अंकिता लोखंडे आणि विक्की जैन, राहुल वैद्य आणि दिशा परमार, कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह, अर्जुन बिजलानी आणि त्यांची पत्नी, अली गोनी आणि जैस्मीन भसीन, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या प्रसिद्ध जोड्या भाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे. (Laughter Chefs 2)
===================================
हे देखील वाचा: Bigg Boss OTT 4 कंफर्म, Salman Khan शोचा ‘या’ दिवशी होणार प्रीमियर !
===================================
‘पति, पत्नी और पंगा’ चा प्रीमियर लवकरच होण्याची शक्यता आहे. या नवीन शोचे प्रोमो आधीच शूट झाले आहेत आणि लवकरच ते कलर्सच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नवीन रिअॅलिटी शोमुळे टीआरपीमध्ये नवीन उभारणी होईल, अशी अपेक्षा आहे.