Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Vadalvaat मालिकेच्या शीर्षक गीताची अनटोल्ड स्टोरी!
कुठलाही चित्रपट किंवा मालिका त्यांच्या कथानकासोबत टायटल सॉंग्समुळे अधिक लक्षात राहतात. विशेषत: मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांनी एक काळ गाजवला आहे. ‘आभाळमाया’ (Aabhalmaya serial), ‘असंभव’, ‘तुजविन सख्या रे’ अशा अनेक मालिकांची शीर्षक गीतं आजही तोंडपाठ आहेत. यापैकीच एक आयकॉनिक टायटल म्हणजे ‘वादळवाट’ (Vadalvaat)… अशोक पत्की (Ashok Patki) यांनी आजवर अजरामर गीतं दिली. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना वादळवाट शीर्षक गीताची फार इंटरेस्टिंग कथा सांगितली आहे…(Marathi daily soaps)

‘वादळवाट’ या मालिकेचं शीर्षक गीत मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. तर झालं असं की एके दिवशी निर्माते शशांक सोळंकी यांनी अशोक पत्की (Ashok Patki) यांना भेटायला बोलावलं. एका शीर्षक गीताला चाल लावायची होती. भेट होईपर्यंत अशोक यांना भीती होती की आपल्या पठडीतील गाणं असेल ना? अखेर मीटींग झाल्यानंतर आपल्याला जमेल हे गाणं करायला असा आत्मविश्वास पत्की यांना आला. शशांक यांनी काही वेळानंतर अशोक पत्की यांना एक मुलगा तुझ्याकडे गाण्याची स्क्रिप्ट घेऊन येईल त्याला चाल लाव असं म्हणाले. सांगितल्याप्रमाणे मुलगा आला त्याने कागद हातात दिला आणि अशोक कामाला लागले.(Bollywood news)

डोक्यात त्याच गाण्याचा विचार सुरु असताना अशोक पत्की टॅक्सीत बसले आणि तेव्हाच मनात एक चाल त्यांनी तयार केली. त्यावेळी अजय-अतुल (Ajay-Atul) अशोक पत्कींसोबत काम करत होते. अशोक चाल लावायला सुरु करणार तितक्यात शशांक यांनी फोन करुन मंगेश कुलकर्णी यांनी नवे शब्द पाठवले आहेत असं सांगितलं. नव्या शब्दांची तपासणी करुन सूचलेल्या चालीसोबत मीटर मॅच होतोय का ते पत्कींनी चाचपडलं. शब्द होते ‘थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले…’ अशोक पत्की यांना वाटलं मीटरमध्ये बसतंय. चाल मनात तयार झाली. आणि सागर, शंख, चांदणं – या शब्दांवर एक लहरणारी चाल पत्कींना सुचली. अखेर वादळवाट शीर्षक गीताची चाल तयार झाली आणि गीत देवकी पंडित यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. अशाप्रकारे अजरामर वादळवाट मालिकेच्या शीर्षक गीताची चाल टॅक्सीत पत्कींना सुचली प्रेक्षकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहिली.(Marathi Entertainment news)
================================
हे देखील वाचा: Raveena Tandon : करिश्मा कपूर सोबतच्या कॅट फाईटवर अखेर रवीनाने सोडलं मौन!
=================================
‘वादळवाट’ मालिका सुरु झाली त्यावेळी पत्रकारिता या विषयावर आधारित तशा बऱ्याच मालिका येऊन गेल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायला हवा तो ‘रिपोर्टर’, ‘शांती’, ‘दामिनी’, इ. मालिकांचा. पण या सगळ्या मालिका पत्रकाराचं आयुष्य, त्याची आव्हाने अशा वैयक्तिक गोष्टी मांडणाऱ्या होत्या. ‘वादळवाट’ इथे वेगळी ठरली. या मालिकेमध्ये दोन वृत्तपत्रांच्या व्यवसायिक स्पर्धेची, नैतिक मूल्यांची आणि आदर्श तत्त्वांची कहाणी दाखवण्यात आली होती. (Vadalvaat serial)