Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?

 एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?
कलाकृती विशेष

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?

by रसिका शिंदे-पॉल 14/06/2025

भारताकडून आजपर्यंत तीनच चित्रपट ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लॅंगवेजच्या शर्यतीत उतरले आहेत. ते म्हणजे ‘मदर इंडिया’ (Mother India), ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’… तिन्ही चित्रपटांना ऑस्कर मिळाला नाही, हे वगळलं तरी International लेव्हलपर्यंत भारताचं नाव यांनी गाजवलं. लगाननंतर मात्र भारताचा एकही चित्रपट या Category पर्यंत मजल मारू शकला नाही. हाच लगान तयार केलेला एका मराठमोळ्या डीरेक्टरने ज्यांचं नाव आहे आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar)… ‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’सारखे एकसे बढकर एक चित्रपट देणारे गोवारीकर २००८ नंतर साधा एक सोलो हिटसुद्धा देऊ शकले नाहीत. त्यांचे काही चित्रपट असे पडले की गोवारीकर यांनी बॉलीवूडमधून रिटायरमेंट घेतली की काय ? असं विचारलं जात होत. मध्यंतरी ते Acting कडेही वळले होते. पण तरीही इतका बलाढ्य चित्रपट निर्माता बॉलीवूडमधून अचानक कुठे गायब झाला. जाणून घेऊया!(Entertainment news Update)

आशुतोष गोवारीकर त्यांच्या तीन सिनेमांसाठी सर्वात जास्त ओळखले जातात, ते म्हणजे ‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’…उत्तम प्लॉट, भव्यदिव्य सेट्स आणि सुंदर गाणी यांनी भरलेले त्यांचे चित्रपट लार्जर THAN लाईफ असतात. ते मुळचे कोल्हापूरचे… त्यांचा Cinematic दृष्टीकोन संपूर्ण भारताचा कानाकोपरा एकत्र आणणारा आहे. त्यातच ऐतिहासिक चित्रपट ही त्यांची उजवी बाजू.. पण हल्लीचे त्यांचे चित्रपट पुरते आपटले. मुळात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टूथपेस्ट आणि लाईफबॉयच्या ads साठी एक मॉडेल म्हणून केली होती. Actor म्हणून त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे होली जो १९८४ साली आला होता. यानंतर ‘नाम’, ‘जाट’, ‘गुंज’, ‘कमला की मौत’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘गवाही’, ‘एक रात्र मंतरलेली’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी सपोर्टिंग actor म्हणून काम केलं. (Bollywood News)

याशिवाय ‘भारत एक खोज’, ‘इंद्रधनुष’ आणि ‘सर्कस’सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये त्यांनी काम केलं होत. मध्यंतरी मकरंद देशपांडे यांनी सर्कसच्या शुटींगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Kha), आशुतोष गोवारीकर आणि स्वत: मकरंद देशपांडे होते. १९९३ पर्यंत जवळपास १५ चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीमध्ये आपली एक ओळख निर्माण करणारे आशुतोष गोवारीकर हे डिरेक्शनकडे वळले आणि आपला पहिला चित्रपट तयार केला तो म्हणजे ‘पेहला नशा’! यामध्ये दीपक तिजोरी, पूजा भट्ट, रवीना टंडन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांचा अमीर खानसोबत बाझी हा चित्रपट आला, जो थोडाफार चालला. यानंतर डिरेक्शन बाजूला सारून पुन्हा आशुतोष गोवारीकर acting मध्ये आले. त्यांनी ‘कभी हा कभी ना’, सरकारनामा, वो या चित्रपटांमध्ये काम केलं. (Trending News)

पण त्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग point ठरला तो म्हणजे ‘लगान’ (Lagaan Movie) ! त्यावेळी स्पोर्ट्स बेस्ड मुव्ही इतके बनत नव्हते आणि अशा वेळी हॉलीवूडसारखा टच देऊन एक जबरदस्त मुव्ही आशुतोष गोवारीकर यांनी तयार केला, जो थेट ऑस्करच्या शर्यतीत गेला. २००१ साली ऑस्करच्या best फॉरेन language फिल्म कॅटेगरीसाठी लगान nominate झाला होता. आजपर्यंत तीनच भारतीय चित्रपट हा कारनामा करू शकले आहेत, त्यापैकी एक म्हणजे आशुतोष यांचा लगान ! या चित्रपटाला 8 national अवार्ड, 8 फिल्मफेअर अवार्ड, ८ स्क्रीन अवार्ड्स आणि १० आयफा अवार्ड्स मिळाले होते. यानंतर त्यांना बॉलीवूडचे best director म्हणून ओळख मिळाली. (Bollywood news Update)

२००४ साली त्यांचा शाहरुख खानसोबत ‘स्वदेस’ (Swades Movie) हा मुव्ही आला. मुव्ही त्यावेळी जरी फ्लॉप ठरला असला तरी हिंदी सिनेमाच्या इतिहासातला cult classic म्हणून गणला गेला. Direction, performance, story, screenplay, songs सर्वांचीच देशभरात चर्चा झाली आणि आशुतोष गोवारीकर बॉलीवूडमधला एक brand झाले. विशेष म्हणजे नासामध्ये शूट होणारा भारताचा हा पहिलाच मुव्ही होता. आता दोन ग्रेटेस्ट सिनेमे दिल्यानंतर गोवारीकर यांचं बळ आणखी वाढलं आणि त्यांनी उडी घेतली थेट मुघलांच्या इतिहासात… ‘जोधा अकबर’ (Jodha Akbar Movie) हा बिग बजेट आणि मोठाले सेट्स असलेला सिनेमा बराच चालला. याला तब्बल ४८ पुरस्कार मिळाले होते. ब्रिटीश फिल्म institute ने या चित्रपटाला ‘१० ग्रेटेस्ट बॉलीवूड फिल्म्स ऑफ द २१st सेंच्युरी’ मध्ये सामील केलं. यानंतर आशुतोष गोवारीकर कमर्शिअल लव्ह स्टोरी सिनेमाकडे वळले आणि त्यांनी हरमन बवेजा आणि प्रियांका चोप्रा यांना घेऊन whats your rashee ? हा सिनेमा बनवला, जो चांगलाच आपटला. अनेकांनी यावर टीका केली की, गोवारीकर यांनी असे सिनेमे करू नयेत. Concept युनिक होती पण तो गोवारीकरांना execute करता आला नाही, असं anek फिल्म क्रिटीक्स म्हणतात. (Bollywood Tadaka)

यानंतर ते पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम या विषयाकडे वळले आणि ‘खेले हम जी जान से’ हा क्रांतिकारकांचा चीत्रपट घेऊन आले. हा चित्रपट चितगाव कटावर आधारित होता. यामध्ये दीपिका पडूकोण (Deepika Padukone) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. पण हा चित्रपटसुद्धा कमाल दाखवू शकला नाही. सलग दोन चित्रपट न चालल्यामुळे पाच वर्षांच्या gap ने आशुतोष गोवारीकर थेट ५ हजार वर्ष जुन्या इतिहासाचा उलगडा करायला निघाले. भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजपर्यंत या विषयावर कोणीच चित्रपट बनवला नव्हता. तोच सिंधू संस्कृतीचा विषय मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लगानची शुटींग करत असताना या विषयावर एक चित्रपट करावा, असं त्यांनी ठरवलं होत. २०१६ साली गोवारीकर यांचा मोहेंजोदारो हा चित्रपट आला होता. फ्रेश स्टोरी, भारताचा सर्वात प्राचीन इतिहास, hritik रोशन सारखा तगडा हिरो… त्यामुळे १०० कोटी बजेट असलेला मुव्ही चालेल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. पण याची जादू चाललीच नाही. हा फ्लॉप होणारा गोवारीकर यांचा सलग तिसरा चित्रपट ठरला. (Ashutosh Gowarikar movies)

यानंतर ते तब्बल १७ वर्षांनी पुन्हा acting कडे वळले आणि त्यांनी मराठी चित्रपटाची वाट धरली. ते राजेश मापुस्कर यांच्या Ventilator मध्ये झळकले. Actor म्हणून त्यांचा हा चित्रपट सुपर हिट ठरला. सलग १० वर्ष त्यांच्या डीरेक्शनमधला एकही चित्रपट हिट न झाल्यामुळे ते पुन्हा एकदा इतिहासाकडे वळले, आणि त्यांनी तयार केला ‘पानिपत द ग्रेट बिट्रेयल’ ! मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर त्यांनी आणला खरा… पण कास्टिंगमध्ये ते चुकले आणि पानिपतचीही माती झाली. यामध्ये सर्वात जास्त टीका अर्जुन कपूरच्या निवडीवर झाली. १०० कोटींचा मुव्ही साधे ५० कोटीही कमवू शकला नाही आणि त्यांच्या फ्लॉप चित्रपटांची संख्या झाली चार ! एकेकाळी बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारा डीरेक्टर अक्षरश: आपटला. जर आपण एक गोष्ट पाहिली तर त्यांनि आपल्या चित्रपटांसाठी निवडलेले विषय चुकीचे नव्हते. पण काहीमध्ये कास्टिंग, काहींमध्ये स्क्रीनप्ले तर काहींमध्ये गाणी याची कमतरता त्यांच्या चित्रपटात राहिली.

================================

हे देखील वाचा: बॉलिवूडचं Spy Universe!

=================================

२०१९ नंतर आज ६ वर्ष झाली, मात्र त्यांचा दिग्दर्शक म्हणून एकही चित्रपट आला नाही. मध्यंतरी त्यांनी काला पानी 9Kaala Paani Web series) आणि मानवत मर्डर्स या web सिरीजमध्ये काम केलं होत. नुकताच त्यांचा आता थांबायचं नाय हा मुव्ही आला, जो सुपरहिट ठरला. मात्र अधिकृत त्यांनी आपल्या एकाही चित्रपटाची घोषणा अजून तरी केलेली नाही. त्यामुळे एकेकाळी ऑस्करच्या रेसमध्ये धावणारा डार्क हॉर्स अचानक गायब कसा झाला, अचा चर्चा सिनेविश्वात रंगल्या होत्या. मात्र नुकतीच त्यांनी शंकर हा आदि शंकराचार्य यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट अनाऊन्स केला आहे. त्यामुळे गोवारीकर पुन्हा कमback करण्याची तयारी करत आहेत. पण जो आशुतोष गोवारीकर सिनेप्रेमींनी लगान, स्वदेस आणि जोधा अकबर मध्ये अनुभवला होता, तो मात्र आता दिसेनासा झालाय. आणि आता प्रेक्षक त्यांच्याकडून त्यांच्याच डीरेक्शनमधल्या एक मेगा बजेट मुव्हीची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Entertainment News masala)

-सागर जाधव

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khan Abhishek Bachchan ashutosh gowairkar ashutosh gowarikar movies Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Entertainment hrithik roshan lagaan movie Oscar award shah Rukh Khan swades movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.