Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!

 Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!
कलाकृती विशेष

Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!

by रसिका शिंदे-पॉल 22/06/2025

‘मोगॅम्बो खुश हुआ…’ हा डायलॉग माहिती नसेल असा एकही सिनेप्रेमी नसेल. बॉलिवूडचा असा एक वर्सटाईल अभिनेता ज्याने प्रत्येक चित्रपटातील नायकाला आपल्या खलनायक भूमिकेने चितपट केलं… ते कलाकार म्हणजे बॉलिवूडचे ग्रेटेस्ट खलनायक अमरीश पुरी (Amrish Puri)…! त्यांच्या बऱ्याच भूमिका प्रचंड गाजल्या. हिंदीमध्ये आपल्या लूक्स आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे अमरीश पुरी यांचं मराठीशी खास आणि पर्सनल कनेक्शन सुद्धा आहे… काय आहे ते चला तर जाणून घेऊया…

अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ ला लाहोर म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये झाला..अमरीश यांच्या घरातच कला आणि अभिनय होता..त्यांचे दोन मोठे भाऊ चमन पुरी आणि मदन पुरी दोघेही अभिनेते ..मासूम, चोर मचाये शोर, हावडा ब्रिज या चित्रपटांमध्ये चमन पुरी यांनी कामं केली होती.. तर त्यांचे दुसरे बंधु मदन पुरी यांनी गद्दार, कालीचरन,एलान, बेनाम या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, प्राण अशा दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली होती.. खरं तर मुंबईला हिरो बनण्याचं स्वप्न पाहून आलेले अमरीश पुरी बॉलिवूडचे बेस्ट खलनायक बनले. पण दोन्ही भावांचे पाय बॉलिूडमध्ये खोलवर रुतले असूनही अमरीश यांचा बॉलिवूडमधला प्रवास काही सोप्पा नव्हता… पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये अमरीश अपयशी ठरले आणि आता अभिनय काय आपल्याला जमणार नाही असा विचार करत त्यांनी एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीत नोकरी सुरु केली होती.

आपल्या वडिलांबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगताना अमरीश यांचा मुलगा राजीव पुरी म्हणाला होता की पप्पांना बऱ्याच निर्मात्यांनी, मेकर्सनी तुमचा हिरोचा नाही तर विलनचा चेहरा आहे असं सांगितलं होतं… ते ऐकून अमरीश यांना वाईट नक्कीच वाटलं पण कालांतराने तिच कॉम्प्लिमेंट समजून अख्ख्या भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांनी हलवून टाकलं..

================================

हे देखील वाचा: Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली पुन्हा एकदा जादू दाखवणार

=================================

५०-६०च्या दशकात चित्रपटात काम करणं म्हणजे हा माणूस बेकार आहे याच नजरेने पाहिलं जात होतं.. शिवाय चित्रपटाचा व्यवसाय हा हलक्या दर्जाचा आहे असाच सगळ्यांचा समज होता.. बरं आजही चित्रपट व्यवसायाचा आवाका वाढला असला तरीही शाश्वती नाहीच बरं का… तर चित्रपटात काम करणं म्हणजे बेकारी आणि याचमुळे अमरीश यांच्या वडिलांचं आपल्या मुलांनी इंडस्ट्रीत जाऊ नये असं ठाम मत होतं.. त्यांच्या नकाराला विरोध करत अमरीश यांचे दोन्ही भाऊ चित्रपटात घुसलेच आणि स्थिरावले.. मग काय आपला मार्गही मोकळा झालाय हे दिसलं आणि अमरीश यांनीही इंडस्ट्रीची गाडी पकडलीच..

अमरीश यांनी १९६१ मध्ये रंगभूमीवरुन आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती… बरं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की एक पंजाबचा मुलगा मुंबईत हिरो बनण्यासाठी आला होता आणि त्याने चक्क हिंदी नाही तर मराठी चित्रपटातून पहिली भूमिका साकारली होती.. १९७१ सालच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या चित्रपटात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यामुळे अमरीश पुरींना पहिला ब्रेक हा मराठी चित्रपटातून मिळाला आणि इथूनच त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशा झाला.. रंगभूमी आपली कर्मभूमी आहे असं समजणारे अमरीश पुरी विजय तेंडूलकर यांना नाटककारांचा राजा असं म्हणायचे.. त्यामुळे मराठी कलेशी त्यांचं नातं फार पूर्वीपासूनच घट्ट होतं हे नक्कीच यातून दिसतं..

त्यानंतर अमरीश यांना बॉलिवूडमधला पहिला ब्रेक वयाच्या ३९ व्या वर्षी मिळाला …१९७१ मध्ये ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी पदार्पण केलं. सुनील दत्त, अमिताभ बच्चन आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रेशमा और शेरा’ चित्रपटात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचं पात्र साकारलं होतं. मग पुढे ‘जागिर’, ‘राम लक्खन’, ‘जादुगर’, ‘नगिना’, ‘बेनाम बादशाह’, ‘शेहनशाह’, ‘कमांडो’, ‘दीवाना’, ‘ऐतराज’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे…’ अशा एकाहून एक दर्जेदार चित्रपटात त्यांनी कामं केली…

तसेच, जपान आणि भारताने एकत्रित प्रोड्युस केलेला Ramayana : The Legend of prince Rama या १९९३ मध्ये आलेल्या animated film च्या हिंदी डब मध्ये रावणाला अमरीश पुरी यांनी आवाज दिला होता… बरं केवळ हिंदीच नाही तर त्यांनी हॉलिवूडमध्येही विलन साकारला होता.. १९८४ साली आलेल्या Steven spielberg यांच्या ‘Indiana Jones and the Temple of Doom’. या चित्रपटात त्यांनी मोला राम हा खलनायक केला होता…या भूमिकेच्या ऑडिशनसाठी अमरीश यांना अमेरिकेत बोलावलं होतं पण मी अमेरीकेत येणार नाही तुम्हाला ऑडिशन घ्यायचं असेल तर भारतात या असं थेट अमरीश यांनी स्पीलबर्गला सांगितलं होतं.. आधी तर अमरीश यांनी चित्रपटाला नकारच दिला होता पण जेव्हा या चित्रपटात उत्कृष्ट Technology वापरली आहे हे सांगितल्यावर अमरीश यांनी या चित्रपटाला होकार दिला होता.. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्यांनी पहिल्यांदा टक्कल केलं होतं आणि अभिमानाची बाब म्हणजे आपल्या भारतातील हा ग्रेट खलनायक चक्क स्पीलबर्ग यांचा सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक होता.अमरीश यांनी या चित्रपटासोबतच रिचर्ड अटनबर्ग यांच्या ‘गांधी’ चित्रपटात दादा अब्दूला हाजी अदाब ही भूमिका साकारली होती..

एकीकडे अभिनेता म्हणून मराठी चित्रपटांचं वाढतं प्रेम त्यांच्या वैयक्तिक जीवनातही आलंच.. चित्रपटात आपलं काही होणार नाही असा समज करुन अमरीश यांनी इन्शुरन्स कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली होती आणि तिथेच एका मराठी मुलीशी त्यांची ओळख झाली.. ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झालं.. त्यामुळे Professional आणि पर्सनल अशा दोन्ही आयुष्यात अमरीश यांची मराठीशी गाठ कायमची बांधली गेली..

अमरीश यांची आणखी एक खासियत होती ती म्हणजे अभिनयासोबतच त्यांना हॅट्स आणि टोप्यांची फार आवड होती..असं सांगितलं जातं की त्यांच्याकडे २०० पेक्षा अधिक टोप्या होत्या ज्या जगभरातून त्यांनी आणल्या होत्या.. काही चित्रपटांमध्येही त्यांनी हॅट्स घातल्याचं आपण पाहिलं आहेच.. आणि चित्रपटात टोपी घालायची असेल तर आपल्याच कलेक्शनमधील टोपी ते निवड असत..

४० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अमरीश पुरी यांनी अनेक चित्रपटात कॅरेक्टर रोल्सही केले.. यामध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘मुझसे शादी करोगे’, ‘हलचल’, ‘चाची 420’, ‘चोरी-चोरी चुपके-चुपके’ ‘लक्ष्य’ या सिनेमांचा उल्लेख करावाच लागेल. ७०च्या दशकात अमरिश पुरी यांनी निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘आक्रोश’ या चित्रपटांमध्ये काम केले . ८० च्या दशकात त्यांनी खलनायकाच्या रुपात अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘हम पांच’, ‘नसीब’, ‘विधाता’, ‘हीरो’, ‘अंधा कानून’ आणि ‘अर्ध सत्य’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी खलनायकाच्या रुपात आपली वेगळी छाप सोडली.

================================

हे देखील वाचा: Shekhar Kapur : हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारा भारताचा ग्रेट डिरेक्टर!

=================================

अमरीश पुरी यांना संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड, फिल्मफेअर , राज्य पुरस्कार, सिंगापुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार असे बरेच अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले होते.. अमरीश यांनी केवळ हिंदीच नाही तर मराठी,कन्नड, पंजाबी, तमिळ चित्रपटसृष्टीतही काम केलं होतं.. अमरीश पुरी यांनी त्यांच्या अभिनयातून खलनायकही कायम लक्षात राहू शकतो हे सिद्ध केलं..आजही त्यांच्या भूमिका आणि कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या आहेत हे अभिमानास्पद नक्कीच आहे.. अमरीश पुरी यांच्या कारकि‍र्दीला कलाकृती मीडियाचा सलाम !

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amrish puri best villan of indian cinema Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood tadaka bollywood update Celebrity dilwale dulhaniya le jayenge Entertainment latest bollywood news mr india
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.