‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Mahavatar Cinematic Universe : भगवान विष्णू यांच्या १० अवतारांचं युनिवर्स ७ चित्रपटांतून मांडणार!
एकीकडे बॉलिवूडमधल्या पहिल्या भव्य पौराणिक ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे… तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच विकी कौशलच्या महावतार या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली होती… पौराणिक चित्रपटांच्या या यादीत आता एका मोठ्या भव्य Mythological Universe ची घोषणा करण्यात आली आहे…भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हे पहिलं पौराणिक चित्रपटांचं युनिवर्स असून यात भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा मांडली जाणार आहे… होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांनी महावतार सिनेमॅटिक युनिवर्सची घोषणा केली असून महावतार नरसिंह ते महावतार कल्कि पार्ट २ पर्यंत हा प्रवास असणार आहे…

तरण आदर्श यांनी सोशल मिडियावर महावतार युनिवर्सच्या २०२५ ते २०३७ या काळात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी असणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे… चित्रपटांची नावं पुढीलप्रमाणे:
-महावतार नरसिंह – 2025
-महावतार परशुराम – 2027
-महावतार रघुनंदन – 2029
-महावतार द्वारकाधीश – 2031
-महावतार गोकुलानंद – 203
-महावतार कल्कि पार्ट 1 – 2035
-महावतार कल्कि पार्ट 2 – 2037

दरम्यान, महावतार सिनेनॅटिक युनिवर्स केवळ चित्रपटांपुरताच मर्यादित न राहता कॉमिक्स, व्हिडिओ आणि डिजिटल माध्यमांवरही या प्राचीन गोष्टींना वेगवेगळं स्वरुप देत नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं जाणार आहे… यापैकी पहिल्या महावतार नरसिंह चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विन कुमार करणार आहेत… या संपूर्ण युनिवर्समध्ये भारतीय संस्कृती आणि भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांची गोष्ट प्रेक्षकांना हिंदी, कन्नडा, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या ५ भारतीय भाषांमध्ये पाहता आणि अनुभवता येणार आहे…तसेच, महावतार नरसिंह हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे… त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला भव्य पौराणिक युनिवर्स अनुभवण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi