‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Bollywood Movie : ७३ वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता?
आजच्या घडीला चित्रपट म्हणजे मोठा व्यवसाय झाला आहे… चित्रपटाची कथा किती छान होती यापेक्षा बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे हे पाहून प्रेक्षक चित्रपट पाहायला जायचं की नाही हे ठरवतात… बरं, ग्लोबली भारतीय चित्रपटांचं स्थान उंचावलं असून भारतात चित्रपट रिलीज होण्याआधी परदेशातील नामांकित फिल्म फेस्टिवल्समध्ये चित्रपटांचे प्रीमियर होतात… जर का तुम्हाला असं वाटत असेल की अलीकडे परदेशात आपले भारतीय चित्रपट प्रद्रशित होतात तर तसं नाहीये… ७३ वर्षांपूर्वी परदेशात पहिला भारतीय चित्रपट वर्ल्डवाईड रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाला १७ भाषांमध्ये सबटायटल्स देण्यात आले होते…जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल…(Bollywood Movie)

तर, परदेशात जो पहिला चित्रपट वर्ल्डवाईड रिलीज झाला होता त्याचं नाव होतं आन. १९५२ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता ज्यात प्रमुख भूमिकेत दिलीप कुमार, निम्मी आणि नादिरा हे झळकले होते…मेहबूब खान दिग्दर्शित ‘आन’ चित्रपट परदेशात रिलीज करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट होता आणि विशेष म्हणजे ‘आन’ (Aan 1952 movie) चित्रपट २८ देशांत आणि १७ भाषांच्या सबटायटल्ससह रिलीज करण्यात आला होता. भारतात प्रेक्षकांचं मन आणि बॉक्स ऑफिसचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने परदेशात चांगलंच प्रॉफिट कमावलं होतं…
================================
हे देखील वाचा: Madhubala : दिलीप कुमार – मधुबालाची अधुरी प्रेमकहाणी!
=================================
५०च्या दशकात खरं तर रंगीत चित्रपटासह नवं तंत्रज्ञान वापरुन तयार केलेले चित्रपट ही प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी होती… आन चित्रपट हा केवळ परदेशात रिलीज होणारा पहिला चित्रपट नव्हता तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला Technicolor चित्रपटही होता… हॉलिवूड चित्रपटांमध्ये या रंगीत तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर केला जातो आणि तेच आधुनिक तंत्रज्ञान १९५२ मध्ये आन चित्रपटात वापरण्याचा निर्णय मेहबूब खान यांनी घेतला होता. आता हॉलिवूडचं तंत्रज्ञान वापरायचं म्हणजे तगडं बजेट आलंच… आणि त्यामुळे मेहबूब खान यांनी निर्मात्यांच्या मदतीने ३.५ कोटींच्या बजेटमध्ये आन चित्रपट तयार केला होता…या चित्रपटाने ७३ वर्षांपूर्वी १.४५ कोटी भारतात आणि २.८० कोटी जगभरात कमावले होते…भारतीय चित्रपटांना ग्लोबली ओळख मिळवून देणारा महत्वपूर्ण चित्रपट होता…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi