Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात Rohini Hattangadi यांना कस्तुरबाची

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kareena Kapoor हिची सिनेमात झाली पंचवीशीची ‘मै अपनी फेवरेट हूं’!

 Kareena Kapoor हिची सिनेमात झाली पंचवीशीची ‘मै अपनी फेवरेट हूं’!
कलाकृती विशेष

Kareena Kapoor हिची सिनेमात झाली पंचवीशीची ‘मै अपनी फेवरेट हूं’!

by दिलीप ठाकूर 01/07/2025

चित्रपटसृष्टीतील कपूर जन्माला येतानाच त्यांना मुव्ही कॅमेर्‍याचे ज्ञान असते की काय असे वाटते. आपल्या पहिल्याच चित्रपटात ते कमालीच्या सहजपणे वावरताना दिसतात तेव्हा तर तसेच म्हणावेसे वाटते. बेबो अर्थात करिना कपूरचेच बघा, जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’ (२०००) हा तिचा व अमिताभ बच्चनपुत्र अभिषेक याचा पहिला चित्रपट, मला आठवतंय मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टीचे फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकीट दिले होते. ‘रिफ्यूजी’ पाहायला जाताना डोक्यात अभिषेक बच्चन होता. पिक्चर संपल्यावर बाहेर पडताना मनात करिना कपूर होती. पहिल्याच चित्रपटात एकदम लक्षवेधक भारी काम केलंय तिने. जवळपास सर्वच समीक्षकांनी बच्चनपुत्रापेक्षा बेबोची जास्त तारीफ केली. जे पडद्यावर दिसले ते मांडले. याच ‘रिफ्यूजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजेच बेबोच्या चित्रपट प्रवासाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखील.(Kareena Kapoor)

केव्हा गेला हो एवढा काळ. खरं तर तिने ह्रतिक रोशनसोबत ‘कहो ना…प्यार है’ (मुंबईत प्रदर्शित जानेवारी २०००) रुपेरी पडद्यावर पदार्पण केले असते, दिग्दर्शक राकेश रोशनने फेमस स्टुडिओत या दोघांवर पहिले चित्रीकरण सत्र पारही पाडले. तेवढ्यात बच्चनपुत्र चित्रपटसृष्टीत आला आणि लोलो व बेबोची आई बबिताची महत्वाकांक्षा जागी झाली. रोशन पुत्रापेक्षा बच्चनपुत्र केव्हाही ‘वजनदार’.(नंतर गणित बदलले) चित्रपटाच्या मुहूर्तापासूनच पब्लिसिटीचा फोकस निश्चित. व्यवहार एकदम चोख. राकेश रोशनला नकार देत जे.पी.दत्ताला होकार दिला. चित्रपट पडद्यावर येताच ‘कहो ना… प्यार है’ची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली. (Bollywood News)

‘रिफ्यूजी’ ला साधारण यशावर समाधान मानावे लागले तोपर्यंत बेबोने अनेक नवीन चित्रपट साईन केले, जवळपास सर्वच गॉसिप्स मॅगझिनच्या मुखपृष्ठावर ग्लॅमरस कव्हरेज मिळवले.भरभरुन मुलाखती दिल्या. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून म्हणजेच बेबोच्या पणजोबांपासून कपूर खानदान हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असल्याने बेबोकडे सांगण्यासारखे बरेच काही होते व आजही आहे. बेबोचे आजोबा राज कपूर, काका आजोबा शम्मी कपूर व शशी कपूर, बेबोचे पिता रणधीर कपूर व आई बबिता, काका ऋषि कपूर व काकी (अर्थात आन्टी) नीतू सिंग, आणखीन एक काका राजीव कपूर, मोठी बहिण लोलो यांच्यावर, त्यांच्या चित्रपटांवर बोलावे/ ऐकावे/ सांगावे/ कौतुक करावे तेवढे थोडेच. या सगळ्या पार्श्वभूमीवर बेबोकडून अपेक्षा होत्याच. पंचवीस वर्षांत तिने कमालीची विविधता दाखवून कपूर खानदानाचे नाव उंचीवर ठेवलीये.

================================

हे देखील वाचा: Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….

=================================

एकिकडे आपला फिटनेस, आपला सैफ अली खानसोबतचा संसार, दोन मुलांचे मातृत्व, आयुष्यातील चढउतार या सगळ्यात बेबोने अतिशय उत्तम समतोल साधलाय. त्यात तिची मॅच्युरिटी दिसतेय. पण तिच्या प्रगतीचे म्हणावे तसे कौतुक खरंच झाले का? बेबो अभिनय क्षेत्रात आली तो काळ उपग्रह वाहिन्या आणि मग डिजिटल मिडियाचा. त्यात कलाकारांना सेलिब्रेटीज म्हटले जाते. त्यात कलाकारांची गुणवत्ता, अभिनय अष्टपैलुत्व, दिग्दर्शकांनी या कलाकारांवर टाकलेला विश्वास, कलाकाराने वेगळ्या भूमिका साकारताना घेतलेली मेहनत, केलेले वाचन, त्यासाठीचे मानाचे पुरस्कार या सगळ्या गोष्टी बाजूला पडत जावून सेलिब्रेटच्या अफेअर्स, लग्न, घटस्फोट, फोटो सेशन, सोशल मिडियातील पोस्ट , त्यावरुन उलटसुलट ब्रेकिंग न्यूज, लाईक्स या गोष्टींना जास्तच महत्व आले. अन्यथा करिना कपूर माधुरी दीक्षित, मनिषा कोईराला, ऐश्वर्या रॉय, विद्या बालन यांच्या दर्जाची (किंबहुना किंचित सरस) अष्टपैलू अभिनेत्री आहे याचे विशेष कौतुक झाले असते.

करिना कपूरच्या प्रगती पुस्तकातील कमालीची विविधता या चित्रपटांतून दिसली, जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’, इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’, करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’, सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘चमेली’, मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘हिरॉईन’, सिद्दीकी दिग्दर्शित ‘बॉडिगार्ड’, विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओमकारा’, रीमा कागती दिग्दर्शित ‘तलाश’, अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम रिटर्न्स, ‘गोलमाल थ्री’…. करिना कपूरने छान दिसणे व चोख व्यक्तिरेखा सादरीकरण हे एकाच वेळेस साध्य केलंय. ‘जब वी मेट’ चित्रपटातील बेबोचं ‘मै अपनी फेवरिट हू’ फारच गाजले (आणि पंचवीस वर्षांच्या वाटचालीत ते जणू अधोरेखित केले) आणि ‘भटिंडा की सिखडी हूं’ हा तिचा डायलॉगही भारी ठरला…

================================

हे देखील वाचा: Kapoor Family : कपूर कुटुंबाच्या निळ्या डोळ्यांचं रहस्य काय आहे?

=================================

करिना कपूर आपल्या कपूर खानदानाच्या खासियतेनुसार आपली कारकीर्द एन्जॉय करतेय आणि त्यामुळेच ती आजही म्हणजेच कारकीर्दीच्या पंचवीशाव्या वर्षीदेखील’आजची तारका’म्हणून ओळखली जातेय. हे यश कमी आहे का सांगा? बेबोबद्दल एक वेगळी आठवण सांगतो. १९९१ ची गोष्ट. दीपक आनंद दिग्दर्शित ‘लगते जिगर’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या जुहू येथील मयूर महल बंगल्यातील चित्रीकरणाच्या रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकारांचा आमंत्रित केले होते. चित्रपटात ऋषि कपूर व करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका. (या चित्रपटाची थीम पिता व कन्या या नात्यावर होती. आणि त्यानुसार हे कलाकार होते) तेव्हा मयूर महल बंगल्यातील एका आडोशाला बबिता व बेबो उभ्या असलेल्या दिसल्या. बेबो अगदीच शाळकरी वयात होती तेव्हा. लोलो, काकासाहेब कसे काम करतायत हे पाहण्याची त्या दोघींना विशेष उत्सुकता असल्याचे त्यांच्या एक्स्प्रेशनवरुन जाणवत होते. एक वेगळीच गोष्ट आम्हा सिनेपत्रकारांना पाह्यला मिळाली. दुर्दैवाने हा चित्रपट या पहिल्याच चित्रीकरण सत्रानंतर बंद पडला…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan Bollywood Bollywood Chitchat bollywood movies bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment news tadaka kareena kapoor kareena kapoor movies latest bollywood news latest entertainment news in marathi refugee movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.