Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट सिनेमा!

 Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट सिनेमा!
बात पुरानी बडी सुहानी

Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट सिनेमा!

by धनंजय कुलकर्णी 02/07/2025

नवकेतन फिल्म्स ला जेंव्हा १९७५ साली पंचवीस वर्षे पूर्ण झाली तेव्हा देव आनंदने तीन चित्रपटांची घोषणा केली. हे तीन चित्रपट तीन आनंद बंधू दिग्दर्शित करणार होते. पैकी पहिला होता ‘जानेमन’ हा चित्रपट जेष्ठ बंधू यांनी चेतन आनंद दिग्दर्शित केला. दुसरा चित्रपट ‘बुलेट’ हा चित्रपट देव आनंदचा धाकट भाऊ विजय आनंद यांनी दिग्दर्शित केला. तर तिसरा चित्रपट होता ‘देस परदेस’ हा चित्रपट स्वतः देव आनंद यांनी दिग्दर्शित केला. हे तिन्ही चित्रपट एकाच वेळी लॉन्च झाले पण एक एक वर्षाच्या गॅप ने प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांसाठी नायक एकच म्हणजे स्वत: देव आनंद होते.

मात्र तीनही चित्रपटांच्या तीन वेगवेगळ्या नायिका आणि तीन वेगवेगळे संगीतकार होते. ‘जानेमन हा चित्रपट लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केला होता नायिका होती हेमा मालिनी. बुलेट या चित्रपटाला आर डी बर्मन यांचे संगीत होते तर नायिका परवीन बाबी होती. ‘देस परदेस’ ला कुणाचे संगीत घ्यावे यावर एकमत होत नव्हते. नवकेतन मध्येच त्यावेळी अमित खन्ना देखील नोकरी करत होते ते गीतकार देखील होते. त्यांनी संगीतकार राजेश रोशन यांचे नाव देव आनंदला सुचवले. देवला वाटले हा नवोदित संगीतकार आपल्या चित्रपटाला काय संगीत देणार? पण जेव्हा त्यांनी ‘ज्युली’ या राजेश रोशन यांनी संगीतबध्द गाणी त्यांनी शांतपणे ऐकली त्यावेळी त्यांनी राजेश रोशन यांना नवकेतनला बोलावले.

त्यावेळी राजेश रोशन ‘प्रियतमा’ या चित्रपटाचे संगीत देत होते. त्यातील ‘कोई रोको ना दिवाने को दिल मचल रहा…’ हे नुकतंच स्वरबध्द केलेले आणि किशोर कुमार यांनी गायलेले गाणं देव आनंद यांना ऐकवलं. हे गाणे ऐकल्यानंतर मात्र राजेश रोशन यांच्या बद्दलचे मत बदललं गेलं आणि नवकेतनच्या ‘देस परदेस’ या चित्रपटाला राजेश रोशन यांनी संगीत देण्याचा निर्णय झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड गाजली. चित्रपटाचा विषय नवीन होता. इंग्लंडमध्ये बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या भारतीयांवर हा चित्रपट होता.(याच विषयावरचा शाहरुख खान यांचा ‘डंकी’ हा चित्रपट येऊन गेला.) या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये करायचे असल्यामुळे त्यांनी भारत सरकारची परवानगी घेतली.

================================

हे देखील वाचा: Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?

=================================

परंतु, सुरुवातीला सरकारने परवानगी दिली नाही. परंतु, देव आनंदने सरकारी अधिकाऱ्यांना चित्रपटाची स्क्रिप्ट दाखवली आणि शूटिंग लंडनमध्ये होणं किती गरजेचं आहे समजावून सांगितले. तेव्हा कुठे परवानगी मिळाली. या चित्रपटात इस्ट लंडनमधील एक बार  The Prospect of Whitby, दाखवला आहे. या बारमध्ये चित्रपटातील अनेक घटना घडतात. या बारमध्ये मात्र देव आनंदला चित्रीकरण करता आलं नाही. देव ने आपले कला दिग्दर्शक टी के देसाई यांना घेऊन तो बार दाखवला. त्याचे काही फोटो घेतले आणि इकडे मुंबईत मेहबूब स्टुडिओमध्ये त्या बारचा सेट उभारला. हुबेहूब लंडनचा बार तयार केला. या चित्रपटासाठी टी के देसाई यांना कला दिग्दर्शनाचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. या चित्रपटाची स्टार कास्ट जबरदस्त होती. टीना मुनीमचा हा पहिलाच चित्रपट होता.

देवआनंद, प्राण, प्रेम चोपडा, अमजद खान, बिंदू, मेहमूद, डॉ श्रीराम लागू, अशी तगडी स्टार कास्ट होती. देवने या चित्रपटाची स्क्रिप्ट ख्यातनाम साहित्यिक मनोहर माळगावकर यांना लिहायला सांगितले. त्यांनी खूप चांगली स्क्रिप्ट लिहिली. देव आनंद देखील ती स्क्रिप्ट आवडली परंतु ते म्हणाले “या स्क्रिप्टला पब्लिक एक्सेप्ट करणार नाही.” हिंदी सिनेमासाठी हवा असलेला क्रिस्पी मसाला या चित्रपट स्क्रिप्ट मध्ये नव्हता. त्यामुळे देव आनंदने ही स्क्रिप्ट न वापरण्याचे ठरवले. नंतर सुरज प्रकाश आणि देव आनंद यांनी स्वतः बसून या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली. चित्रपट जबरदस्त बनला होता. यातील गाणी नवकेतनच्या परंपरेला साजेशी अशी होती. यातील टायटल सॉंग ‘ये देस परदेस….’ मस्त जमून आलं होतं.

‘नजराना भेजा किसी ने प्यार का…’ हे गाणं जितके श्रवणीय होतं तितकच त्याचं चित्रीकरण देव ने फार सुंदर केलं होतं.( हे गाणे १९६१ सालच्या ब्रिटीश मूव्ही ‘द यंग वन्स’च्या टायटल सॉंग वर आधारीत होते.) या चित्रपटात किशोर कुमार, अमित कुमार, मनहर उदास आणि विजय बेनेडिक्ट यांनी गायलेलं ‘नजर लगेना साथियो…’ हे गाणं खूप गाजले. ‘आप कहे और हम ना आये ऐसे तो हालात नही’ हे लता मंगेशकर यांचे गाणे मेहंदी एका गाजलेल्या गजल वरून घेतलं होतं. लता –किशोर चे नटखट युगल गीत ‘जैसा देस वैसा भेस ‘बिनाकात खूप गाजलं होतं. चित्रपट कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज चा होता.

================================

हे देखील वाचा: ‘गीत गाता हूं मै…’ गाण्याच्या रेकोर्डिंगचा अफलातून किस्सा!

=================================

प्रेक्षकांना लंडन सिटी यातून पाहायला मिळाली. (देव चे अत्यंत आवडते शहर होते लंडन. दुर्दैवाने त्याने अखेरचा श्वास याच शहरात घेतला.) देव ने या सिनेमा साठी खूप कष्ट घेतले. भरपूर खर्च केला. त्याने पर्सिस खंबाटा हिचा देखील नायिकेच्या भूमिकेसाठी विचार केला होता. २९ जून १९७८ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट नवकेतन चा शेवटचा सुपरहिट सिनेमा म्हणता येईल. कारण यानंतर पुढची 25-30 वर्ष देव आनंद चित्रपट काढत होते पण त्यांच्या कुठल्याही चित्रपटाला देस परदेस इतके घवघवीत यश मिळाले नाही.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood latest news Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News des pardes movie Dev Anand Entertainment entertainment latest news in marathi Entertainment News Kishore Kumar retro news tina munim
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.