“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

Panchayat 4 : सचिवजी आणि रिंकीचा किसींग सीन का हटवला?
सध्या सगळीकडेच फुलेराची निवडणूक, नवा प्रधानजी आणि फुलेरा गावातील एकूण निवडणूकीची रणधुमाळी हिच चर्चा रंगली आहे… बहुप्रतिक्षित पंचायत या वेब सीरीजचा चौथा सीझन नुकताच रिलीज झाला असून यावेळी निवडणूकीसाठी आखली जाणारी रणनिती यासोबतच प्रेमाचा एक वेगळा अॅंगलही दिसला…एकीकडे निवडणूकीसाठी सुरु असलेला खेळ आणि दुसरीकडे रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलणारं प्रेम प्रेक्षकांना चांगलंच एन्टरटेंन करत होतं…पंचायत ही वेब सीरीज खरं तर कौटुंबिक आहे.. पण तरीही सीरीजमध्ये आता प्रेम म्हटलं की जरा इंटीमेट सीन किंवा किसींग सीन आलेच… पंचायतमध्येही रिंकी आणि सचिवजी यांच्यात किसींग सीन असणार होता मात्र ते हटवला गेला… काय होतं या मागचं कारण चला जाणून घेऊयात…(Bollywod

पंचायत ४ मध्ये खरं तर खुप काही घडलं… फुलेरा मधली पंचायत निवडणूक, प्रल्हाद ला दिलेली आमदारकीची ऑफर आणि सचिवची-रिंकीची लव्हस्टोरी एका वेगळ्याच वळणावर जाताना दिसली… एका सीनमध्ये रिंकी आणि सचिवजी एकमेकांच्या जवळ जाताना दिसले.. खरं तर मेकर्सना तो किसींग सीन असावा असं वाटत होतं आणि त्याबद्दल रिंकी म्हणजे अभिनेत्री सानविका हिला सांगितलंही गेलं.. पण सानविकाने (Sanvikaa) किसींग सीन द्यायला नकार दिला. नकार देण्यामागचं कारण तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे…

‘जस्ट टू फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सानविका म्हणाली की, “पहिल्यांदा जेव्हा स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा मेकर्सने मला किसींग सीनविषयी काहीच कल्पना दिली नव्हती. नंतर या सीझनचा दिग्दर्शक अक्षत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, या सीझनमध्ये एक किसींग सीन असावा अशी मेकर्सची इच्छा आहे. रिंकी गाडीवरुन जात असते आणि ती पडते. तेव्हा त्यांच्यात किस होतं असा असा तो सीन असणार होता. मी म्हटलं की मला विचार करायला दोन दिवस हवे आहेत. मी फार विचार केला आणि मला वाटलं की पंचायत या सीरीजचा फॅमिली ऑडियन्स खुप आहे. त्यांना हा किसींग सीन योग्य वाटेल का? तर माझं मलाच उत्तर नाही मिळालं आणि म्हणून मी त्यांना किसींग सीन करण्यास नकार दिला.”

पुढे त्या सीनबद्दल अधिक बोलताना सानविका म्हणाली की,”नंतर सेटवर शूट करताना तो सीन हटवला गेला. तिथे मग त्यांनी तो पाण्याच्या टाकीचा सीन ठेवला. ज्यात आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ येतो असं दाखवलंय. आपण हे चुकीच्या पद्धतीने दाखवणार नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण ते करताना थोडं विचित्र वाटतंच. पण जितेंद्र खूप चांगला आहे. त्याने मला कंफर्टेबल केलं. आम्ही मग शूटही त्याच पद्धतीने केलं ज्यात आम्ही किस करत नसूनही एकमेकांच्या जवळ येऊन किस केल्यासारखंच ते काहीसं दिसतं.”
================================
हे देखील वाचा: Panchayat 4: फुलेरा गावात रंगणार निवडणूकीची रणधुमाळी; ‘पंचायत’चा टिझर रिलीज
=================================
‘पंचायत ४’ मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक, सुनीता रजवार आणि पंकज झा असे अनेक कलाकार असून वेब सीरीजची कथा चंदन कुमार यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi