Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात Rohini Hattangadi यांना कस्तुरबाची

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava Yeu Dya 2’ चे सूत्रसंचालन !

 निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava Yeu Dya 2’ चे सूत्रसंचालन !
टीव्ही वाले मिक्स मसाला

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava Yeu Dya 2’ चे सूत्रसंचालन !

by Team KalakrutiMedia 02/07/2025

मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. विशेषतः सुत्रसंचालक निलेश साबळे यांची अनुपस्थिती ही चर्चेचा केंद्रबिंदू ठरत होती. आणि त्याच्या जाएगी आता कोण? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.(Chala Hava Yeu Dya 2)

Chala Hava Yeu Dya 2

अभिजीत खांडकेकरने यापूर्वी अनेक पुरस्कार सोहळे, कथाबाह्य कार्यक्रम आणि रंगतदार सादरीकरणांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता तो एका सुपरहिट विनोदी कार्यक्रमाचं सूत्रधार म्हणून रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याची निवेदनशैली आणि टायमिंग लक्षात घेता, विनोदी कार्यक्रमात त्याची उपस्थिती प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नवीन देणारी ठरेल. या पर्वाच्या दिग्दर्शनाची सूत्रं यावेळी निलेश साबळेऐवजी प्रियदर्शन जाधव, अमोल पाटील आणि योगेश शिरसाट यांच्या हाती असणार आहेत. लेखक मंडळातही बरीच नावं नव्यानं झळकणार आहेत – प्रियदर्शन जाधव, योगेश शिरसाट यांच्यासोबत अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, पूर्णानंद वांडेकर आणि अनिश गोरेगांवकर यांचाही सहभाग आहे.

Chala Hava Yeu Dya 2

कलाकारांमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे यांच्यासोबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे याची एन्ट्री झाली आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे या टिझरमध्ये दिसले नसल्यामुळे त्यांच्या सहभागाबाबत अद्यापही संभ्रम आहे, पण इतर काही लोकप्रिय चेहरे या पर्वात झळकणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, नव्या पर्वासाठी ऑडिशन्स सुरू असून, काही नवोदित चेहरेही या मंचावर झळकणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना नव्या आणि जुन्याच्या संगमातून एक ताजं हास्यरसिक पर्व पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

=============================

हे देखील वाचा: Manache Shlok Poster: ‘मना’चे श्लोक’मधून मृण्मयी देशपांडेचे निर्मिती क्षेत्रात पाऊल; सिनेमाचे अनोखे पोस्टर झाले लॉन्च !

==============================

‘चला हवा येऊ द्या’ने गेली तब्बल १० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर थोडक्याच विश्रांतीनंतरत्यांची तीच टीम  ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमधून कलर्स वाहिनीवर आला होता. मात्र कमी प्रतिसादामुळे तो शो थांबवण्यात आला. त्यामुळे आता ‘चला हवा येऊ द्या‘च्या पुनरागमनाकडं प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhijit Khandakekar Abhishek Gavakar Anish Goregaonkar Chala Hawa Yeu Dya 2 Entertainment gaurav more Kushal Badrike and Bharat Ganeshpure Maharashtra's Comedy Festival nilesh sabale priyadarshan jadhav Purnanand Wandekar Rohit Kotekar shreya bugde
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.