Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Raj Thackeray : मराठी कलाकारांसमोर राज ठाकरे यांनी ए.आर.रेहमान यांचं केलं कौतुक!
गेल्या २० वर्षांपासूनच प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आज पूर्ण झालं… अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray and Uddhav Thackeray) यांनी एकत्र यायचं ठरवलं असून हिंदी भाषेविरोधात दोघांनी एकत्र आवाज उठवून सरकारचं धोरण धुळीस मिळवलं… आज ५ जुलै २०२५ रोजी ठाकरे बंधुंचा यशस्वी मेळावा झाला असून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते, सामान्. नागरिकांसह काही मराठी कलाकार मंडळी देखील हजर होती.. यावेळी राज ठाकरेंनी मराठी कलाकारांच्या समोर संगीतकार ए.आर.रेहमान (A R Rehman) यांचं कौतुक केलं… काय घडलं होतं जाणून घेऊयात…

राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणात मराठी भाषेवर प्रत्येकाचं प्रेम आणि आस्था असली पाहिजे असं आपलं मत पुन्हा एकदा मांडलं.. यावेळी भाषेचं उदाहरण देताना त्यांनी ऑस्कर विजेता बॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान याचं कौतुक केलं. ते म्हणाले की, “ए आर रहमान मद्रास ख्रिश्चनरी हायस्कूलमध्ये शिकले आहेत. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूत एका कार्यक्रमात ए आर रहमान व्यासपीठावर उपस्थित होते त्यावेळी निवेदिका तामिळमध्ये बोलत होत्या. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्याच्यावर रहमानने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले हिंदी? आणि ते सरळ त्या व्यासपीठावरून खाली उतरला. तुमचा कडवट पण हा तुम्ही शिक्षण कुठे घेतलं यावर नसतो तर तो स्वत:मध्ये असावा लागतो”.
================================
हे देखील वाचा: Raj And Uddhav Thackeray : “मराठी भाषेचा विजय झालाय”; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
=================================
दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांसमोर ए.आर,रेहमान यांना दिलेल्या या उदाहरणाचा रोख मराठी कलाकारांकडे होता का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे… सामान्य नागरिकांसह मराठी कलाकारांनी देखील आपल्या मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि मराठी भाषा जगवण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले पाहिजे आणि मराठी भाषेचा अट्टाहास बाळगला पाहिजे असा छुपा संदेश नक्कीच राज यांनी यावेळी भाषणातून नक्की दिला… राज आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी वरळी डोमवर तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव असे काही कलाकार हजर होते…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi