Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

Janhavi Kapoor : मराठी भाषेचा उत्सव साजरा करुया; जान्हवीचा मराठी भाषेच्या मुद्दयात सहभाग!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरुन वादंग निर्माण झालं आहे… सामान्य नागरिकांसह कलाविश्वातूनही मराठी भाषेची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला… आता या मुद्द्यावर अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) हिने सहभाग घेतला असून तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया (Shikhar Pahariya) याने मराठी भाषेवर केलेल्या पोस्टला तिने दुजोरा दिला आहे… शिखरने आपल्या पोस्टमध्ये,””आपली मराठी अस्मिता धमकावून नव्हे, तर सर्वांच्या समावेशातून चमकू द्या. मराठी हे हत्यार बनवू नका, त्यापेक्षा भाषेचा उत्सव साजरा करून त्याचे रक्षण करूया”, असं लिहिलं आहे…
शिखर पहारिया याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,”आपली मराठी अस्मिता धमकावून नव्हे, तर सर्वांच्या समावेशातून चमकू द्या. मराठी हे हत्यार बनवू नका, त्यापेक्षा भाषेचा उत्सव साजरा करून त्याचे रक्षण करूया. अस्मिता ही स्वतःची ओळख उंचावणारी भावना असावी, कुणाच्यातही फूट पाडणारी नसावी. आपण भारतात कुठल्याही भागात राहत असलो किंवा आपण कोणतीही भाषा बोलत असलो तरी अस्मिता ही आपल्याला अभिमान देते, कोणताही पूर्वग्रह दुषित विचार देत नाही. मराठी अस्मिता खरी आहे. ती भावनिक स्तरावर आणि आपल्या जीवनशैलीत खोलवर रुजलेली आहे”.(Latest News)

पुढे त्याने लिहिलं आहे की,”सोलापूरमधील एक व्यक्ती म्हणून, मला ही बाब निश्चित समजते. प्रत्येक भाषा आपल्याला घडवते, राज्यांना आकार देते, आपल्याला कवितांपासून ते क्रांतीची प्रेरणा देते. मराठीही त्याला अपवाद नाही. आपण सर्व भाषांप्रमाणेच मराठीही जपली पाहिजे, संरक्षित केली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे. पण तो अभिमान इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का लावून मिळवलेला असू शकत नाही. जे प्रामाणिकपणे कष्टाने जगत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावता कामा नये. सोलापूरचे बरेच लोक कठोर परिश्रम करण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाता येथे प्रवास करतात. कल्पना करा की जर त्यांना तेथे या भाषेसाठी अपमानित केले गेले तर तेव्हा आपण काय करायचे?”
मराठी भाषेच्या धोक्याविषयी लिहिताना शिखर म्हणतो,”जेव्हा लोकं संघर्ष करत असतात आणि कठोर परिश्रम करत असतात, त्यांच्या कुटुंबांपासून दूर असतात, तेव्हा हिंसक कृतीद्वारे अशा गोष्टी लादणे स्वीकारारण्यासारखे नाही. मुंबईत लोक हिंदी, तमिळ किंवा गुजराती बोलतात ही शोकांतिका नाही. खरी शोकांतिका म्हणजे मराठीला धोका आहे असे मानणे. भीती दाखवून आपण एखादी भाषा जिवंत ठेवू शकत नाही. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत हे त्या सर्वांचे आहे, जे सन्मानाने जगतात, प्रामाणिकपणे काम करतात आणि स्वाभिमानाने बोलतात, मग त्यांची भाषा कोणतीही असो”. दरम्यान, जान्हवी कपूरने त्याची मराठी भाषेविषयीची ही पोस्ट शेअर करत मराठी भाषेला आणि त्याच्या विचारांना पाठिंबा दिला आहे…(Bollywood News)
================================
हे देखील वाचा:
=================================
दरम्यान, जान्हवी कपूर हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘धडक’ चित्रपटापासून तिचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला होता.. या चित्रपटानंतर तिने ‘गुंजन सक्सेना’, ‘रुही’, ‘गुडलक जेरी’, ‘मिली’, ‘बवाल’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस माही’, ‘उलजाह’, ‘देवारा १’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत…(Janhavi Kapoor Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi