Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Kaun Banega Crorepati 17 PROMO: ‘या’ दिवसापासून अमिताभ बच्चन पुन्हा भेटायला येणार !
भारतीय टेलिव्हिजन विश्वात अनेक शो दरवर्षी सुरू होतात, काही प्रेक्षक विसरुन जातात तर काही काळाच्या कसोटीवर उतरतात. मात्र, ‘कौन बनेगा करोडपति’ (KBC) हा शो गेली दोन दशके आपल्या दर्जेदार सादरीकरणामुळे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूत्रसंचालकामुळे आजही तितकाच लोकप्रिय आहे. सन 2000 पासून सुरू झालेल्या या ज्ञानाधारित क्विझ शोच्या नव्या हंगामाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यंदाही या शोची सूत्रसंचालनाची धुरा महानायक अमिताभ बच्चन सांभाळणार आहेत. बिग बींच्या चाहत्यांना त्यांच्या चित्रपटांइतकीच केबीसीचीही आतुरता असते. त्यांच्या आवाजातलं “आपका सवाल ये रहा…” हे वाक्य पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे.(Kaun Banega Crorepati 17 PROMO)

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रोमो व्हिडिओने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या प्रोमोमध्ये एक घमंडी आणि श्रीमंत गृहस्थ एका सेल्समनवर राग काढतो, कारण त्या तरुणाने त्याच्या विदेशी कार्पेटवर पाय ठेवले होते. मात्र, शांतपणे ऐकून घेतलेला हा तरुण शेवटी बोलतो आणि त्या कालीनाच्या फायबर, धूळनिरोधक क्षमतेबद्दल माहिती देतो. तो म्हणतो, “असाच कार्पेट आमच्याही भदोहीत तयार होतो आणि तो याहूनही चांगला असतो.” तेवढ्यात अमिताभ बच्चन फ्रेममध्ये प्रवेश करतात आणि त्यांचा बिनधास्त संवाद, “जिथे अकल असते, तिथे अकड असते!. हा प्रोमो केवळ मजेदारच नाही, तर त्यात बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ सिनेमाचा एक ट्विस्टही जाणवतो.

‘कौन बनेगा करोड़पति’ची सुरुवात 2000 मध्ये झाली, त्या काळात अमिताभ बच्चन स्वतः आर्थिक अडचणींना सामोरे जात होते. हा शो त्यांच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. एकदा शाहरुख खान यांनी एका सीझनसाठी सूत्रसंचालन केलं असलं, तरी बच्चन लवकरच पुन्हा परतले आणि आजवर प्रत्येक हंगामात तेच चेहरा राहिले.(Kaun Banega Crorepati 17 PROMO)
===============================
===============================
या नव्या सिजनचा प्रीमियर 11 ऑगस्ट रोजी होणार असून, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर तो प्रसारित होणार आहे. ज्ञान, आत्मविश्वास आणि यशाच्या शोधात निघालेल्या सामान्य माणसांची हीजर्नी पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि त्यांच्यासोबत असेल ‘हॉट सीट’वरून विचारले जाणारं अमिताभ बच्चन यांचं प्रत्येक प्रश्न!