Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

“मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण…”; Ajinkya Deo बॉलिवूडमधील

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर

Aadinath Kothare दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत!

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

लहानग्या गरजु मुलांसाठी गायिका Palak Muchhal बनली देवदुत; गिनीज बुक

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात झाली सुपरस्टार!

 Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात झाली सुपरस्टार!
मिक्स मसाला

Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात झाली सुपरस्टार!

by रसिका शिंदे-पॉल 18/07/2025

कलाकार चित्रपटातील त्यांच्या खास शैलीतील डायलॉग्समुळे फेमस होतात… पण १० वर्षांपूर्वी एक असा चित्रपट आला होता ज्यात चिमुकल्या अभिनेत्रीने एकही शब्द न बोलता प्रसिद्धी मिळवली होती… तो चित्रपट म्हणजे ‘बजरंगी भाईजान’… सलमान खान (Salman Khan) याची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला रिलीज होऊन १० वर्ष पुर्ण झाली असून यात ‘मुन्नी’ची भूमिका हर्षाली मल्होत्रा हिने केली होती… तिच्या करिअरमध्ये ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan) चित्रपट टर्निंग पॉईंट ठरला होता… आता हर्षालीने चित्रपटाला १० वर्ष झाल्याच्या आनंदात एक खास भावनिक पोस्ट केली आहे… काय लिहिलं आहे मुन्नीने पाहूयात…

हर्षाली मल्होत्रा अर्थात मुन्नीने ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाची पडद्यामागील क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यासोबत एका भावनिक पोस्टमधून हर्षालीने सांगितले की या चित्रपटाने तिला कशी ओळख दिली, तिचे आयुष्य कसे बदलले.हर्षालीने लिहिलं आहे की, “१० वर्षांपूर्वी… एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, जी फक्त एक कथा नव्हती. ती एक भावना होती. प्रेम आणि मानवतेचा संदेश होता, ज्याने कोट्यावधी लोकांच्या मनाला स्पर्श केला होता. जेव्हा ‘बजरंगी भाईजान’ माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी फक्त सहा वर्षांची होते. मी चित्रपटात एकही शब्द बोलले नाही… पण, मला कधीच वाटले नव्हते की माझे गप्प बसणे इतके ऐकले जाईल, इतके जाणवेल. त्या वयात मला फार काही माहीत नव्हते, पण मला ‘मुन्नी’ समजत होती. मुन्नी निर्दोष, शांत होती, पण चित्रपटाचा संपूर्ण आत्मा तिच्यात होता. तिने विश्वास ठेवला. तिने प्रेम केले. तिने अनुभवले आणि तुम्ही सर्वांनी तिच्यावर एक प्रकारची उबदारता दाखवली, ज्याबद्दल माझ्याकडे अजूनही शब्द नाहीत.”(Bollywood News)

पुढे हर्षालीने लिहिलं आहे की,”चित्रपटाच्या पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर मी लहान होते- जिज्ञासू, खोडकर, पण खूप संवेदनशीलदेखील. हिंसक दृश्यांना मी घाबरायचे. मी माझे कान बंद करायचे, खुर्च्यांमागे लपायचे, कधीकधी रडायचे कारण मला काय चालले आहे ते समजत नव्हते. ‘बजरंगी भाईजान’चा सेट माझ्यासाठी एक सुरक्षित जागा होती. सलमान सरांमुळे मला नेहमीच सुरक्षित वाटलं. सर्वात प्रेमळ काकांसारखे. कबीर सर प्रत्येक दृश्याला एक कहाणी बनवत होते, अशी गोष्ट जी मी जे अनुभवू शकते. फक्त अ‍ॅक्टिंगच नाही. स्पॉट दादापासून ते मेकअप दीदीपर्यंत सर्वांनी मला स्वतःचे मानले होते”.(Entertainment News)

“आम्ही बर्फाळ पर्वतांवर आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांवर शूटिंग करत होतो… चित्रपटानंतर लोकांनी मुन्नीला ‘बजरंगी भाईजान’चा आत्मा म्हटले… आणि आजही मला जगभरातून संदेश मिळतात की मुन्नीने त्यांच्या हृदयाला किती खोलवर स्पर्श केला आहे. १० वर्षांनंतरही ते प्रेम कमी झालेले नाही. या पोस्ट… या आठवणी… हे रील्स माझ्याकडून एक छोटेसं आभार आहे त्या सर्वांना ज्यांनी मला ही सर्वात मोठी भेट दिली. ज्या टीमने हे शक्य केले, ज्या प्रेक्षकांनी चित्रपट अमर केला. मुन्नीला, जी नेहमीच माझ्यात राहील”, हर्षालीच्या या इमोशल पोस्टवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत…

================================

हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

=================================

दरम्यान, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सलमान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी,करिना कपूर, ओम पुरी, शरत सक्सेना,राजेश शर्मा, हर्षाली मल्होत्रा या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या… तर, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ४७३.२६ कोटी कमावले होते… दरम्यान, लवकरच ‘बजरंगी भाईजान २’ चित्रपट येणार असं जाहिर झालं असून या हर्षाली असणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bajrangi bhaijaan Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment harshali malhotra kabir khan latest entertainment news salman khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.