
Ajay Devgan : ‘सन ऑफ सरदार २’ मधील आणखी एका गाण्यामुळे अजय झाला ट्रोल!
अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या चित्रपटातील गाणी आणि विशेषत: अजय देवगण याचा डान्स सध्या तुफान व्हायरल झाला आहे… या चित्रपटातील ‘पेहला तु…’ या गाण्यात केवळ बोटांनीच डान्स केला आहे अस म्हणत लोकांनी त्याला ट्रोल केलं… आणि आता २०१२ मध्ये आलेल्या सन ऑफ सरदार चित्रपटातील पो पो हे गाणं नव्या रुपात दुसऱ्या भागात रिलीज केलं आहे…

दरम्यान, ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट २०१२ साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता या चित्रपटाचा सिक्वेल सन ऑफ सरदार २ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘पो पो’ असे या गाण्याचे नाव असून या गाण्यातील मजेशीर हावभावांमुळे आजही हे गाणे लक्षात आहे. या गाण्यात सलमान खानने कॅमिओ केला होता आणि त्याच्यासोबत संजय दत्त आणि अजय देवगण यांनीही नृत्य केलं होतं…. आता दुसऱ्या भागातील या गाण्यात अजय देवगण, मृणाल ठाकूर, गुरु रंधावादेखील दिसत आहे. या गाण्यातील स्टेप्सवरुनही नेटकऱ्यांनी अजयला टार्गेट केलं आहे…

आता हे गाणे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “अजय देवगणच्या डान्स स्किल्स दिवसेंदिवस चांगल्या होत आहेत”, तर, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “संजय दत्त या गाण्यामध्ये पाहिजे होते”, हे गाणे जबरदस्तीने बनवले आहे”, “या अशा डान्स स्टेप आहेत, ज्या मी आत्मविश्वासाने करू शकतो”, “कॉलेजच्या दिवसांत या गाण्यावर खूप डान्स केला आहे”, “या गाण्यात कोणा-कोणाला सलमान खानची आठवण आली?”, “अजय सरांनी मीम्सला जरा जास्तच गांभिर्याने घेतले”, “सरावाने परिपूर्णता येते. १० वर्षांपूर्वी अजय देवगण ‘बस तेरी बस तेरी’ गाण्यात फक्त एका बोटाचा वापर करत असे. आता तो त्याच्या सगळ्या बोटांचा वापर करतोय”, अशा मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहे…
================================
हे देखील वाचा : अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!
=================================
विजय कुमार अरोरा दिग्दर्शित ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी रिलीज होणार आहे… या चित्रपटात अजय देवगणसह मृणाल ठाकूर, मुकूल देव, अश्विनी काळसेकर, चंकी पांडे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत… पहिल्या भागाइतकाच दुसरा भाग यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Ajay Devgan Movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi