
Akshay Kumar ७०० स्टंटमॅन्ससाठी ठरला देवमाणूस!
बॉलिवूड असो, साऊथ इंडियन असो किंवा अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपट असो अॅक्शन सीन्स करताना बऱ्याचदा मुख्य कलाकरांऐवजी स्टंट मॅन तो सीन करत असतात… काही दिवसांपूर्वी एका तमिळ चित्रपटाचं शुटींग करताना स्टंटमॅन एसएम राजू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे… काय आहे जाणून घेऊयात…

तर,तामिळनाडूमध्ये काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक रणजित यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंटमॅन एसएम राजू यांचा मृत्यू झाला होता… या घटनेमुळे केवळ साऊथ इंडस्ट्रीच नाही तर संपूर्ण भारतीय मनोरंजनसृष्टी हादरली आहे… यापूर्वी देखील असे स्टंट करताना स्टंटमॅन्सचा अपघात झाला आहे… आणि आता तमिळनाडूतील या प्रकरणानंतर स्टंटमनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता अपघातानंतर अक्षय कुमार याने चित्रपटसृष्टीतील स्टंटमन आणि स्टंटवुमन यांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने भारतातील जवळपास ७०० स्टंटमॅन आणि स्टंटवुमन यांच्या हेल्थ पॉलिसी काढल्या आहेत… महत्वाचं म्हणजे अक्षय कुमार स्वत:च्या चित्रपटामध्ये स्टंट करत असल्यामुळे त्याला जोखिम माहित असल्यामुळे त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे…

अक्षय कुमारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती ‘गुंजन सक्सेना’, ‘अंतिम’, ‘ओएमजी २’ आणि आगामी ‘धडक २’ आणि ‘जिगरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे स्टंट प्रोफेशनल विक्रम सिंह दहियादिली. त्यांनी माहिती देताना म्हटलं की,”अक्षय सर यांच्यामुळे बॉलिवूडमधील जवळपास 650 ते 700 स्टंटमन आणि ॲक्शन क्रू सदस्य आता विम्याद्वारे संरक्षित झाले आहेत. पॉलिसीमध्ये 5 ते 5.5 लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध आहे. दुखापत सेटवर झाली असो वा सेटबाहेर, या पॉलिसीद्वारे संरक्षण मिळेल”.
================================
हे देखील वाचा : Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
=================================
दरम्यान, अक्षय कुमार याचा नुकताच ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपट प्रदर्शित झाला होता… याशिवाय ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटातही अक्षयने उत्कृष्ट काम केलं होतं… आता लवकरच अक्षय ‘वेलकम टू द जंगल’, ‘जॉली एल.एल.बी ३’ आणि ‘भूत बंगला’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi