लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

जेव्हा Amitabh Bachchan , स्पायडर मॅन आणि टायटॅनिकचा हिरो एकत्र आले होते!
बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) … फक्त भारतीय नाही तर वर्ल्ड सिनेमामधलं खूप मोठं नाव… ६० वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये त्यांचा दबदबा आजही कायम आहे, असा हा एव्हरग्रीन कलाकार ! आता इतकं सगळ असताना हॉलीवूड त्यांना ओळखणार नाही, असं होऊच शकत नाही. आणि हॉलीवूडमधून त्यांना बऱ्याच ऑफर आल्या होत्या, ज्याला त्यांनी नकार दिला होता. पण एका हॉलीवूड मुव्हीमध्ये ते झळकले होते… ते सुद्धा चक्क आपल्या स्पायडर मॅन (Spider-Man) आणि टायटॅनिकच्या (Tita हिरोसोबत !

२०१३ साली आलेल्या ‘The Great Gatsby’ या हॉलीवूड मुव्हीमध्ये अमिताभ बच्चन, लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅग्वायर यांनी एका सीनसाठी स्क्रीन शेअर केली होती. हा सीन तुम्ही बघू शकता, जेव्हा हे तीन दिग्गज एकत्र झळकले होते. यामध्ये अमिताभ यांनी एका मेयर वोल्फशिम नावाच्या श्रीमंत ज्युईश माणसाचा रोल केला होता. यांच्यानंतर बिग बी एकदाही हॉलीवूड मुव्हीमध्ये झळकले नाहीत. पण या तीन कलाकारांचा हा सीन आजही सर्वात आयकॉनिक सीन म्हटला जातो. The Great Gatsby या चित्रपटाचं दिग्दर्शन Baz Luhrmann यांनी केलं होतं… २०१३ साली आलेल्या या रोमॅंटिक ड्रामा चित्रपटाचं कथानक स्कॉट फिट्झगेराल्ड यांच्या १९२५ च्या कादंबरीवर आधारित होतं…
================================
हे देखील वाचा: Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!
=================================

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या एकूणच सिने कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर, अलिकडेच त्यांनी फक्त पुरुषो माटे या गुजराती चित्रपटात काम केलं होतं.. बिग बी यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी, तमिळ, मल्याळम, तेलुगू चित्रपटांत कामं केली आहेत.. यात कांदाहार,मनम, उल्लासम,वेट्टीयन या साऊथ चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…तसेचस लवकरच अमिताभ बच्चन ‘कल्की २’, ‘ब्रम्हास्त्र २’, ‘सेक्शन ८४’,’Thalaivar 170′ या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत…