Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

 ‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

by Team KalakrutiMedia 23/07/2025

मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता समीर पाटील याने झी मराठीवरील ‘शिवा’ या गाजलेल्या मालिकेतून एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ हे या भूमिकेच नाव. या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. मात्र आता समीर पाटील यांनी या मालिकेतून अधिकृतपणे एक नवीन वळण घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ‘रामभाऊ’ या भूमिकेचा निरोप घेतल्याची माहिती दिली.(Shiva Marathi Serial)

Shiva Marathi Serial

“रामभाऊ…म्हणजे माझ्या अभिनयप्रवासातील एक भावनिक वळण. आता ही भूमिका मी साकारत नसल्याचं सांगताना मनात खूप भावना एकत्र येतात,” असं त्यांनी स्पष्ट केलं. या भूमिकेद्वारे त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, ज्यासाठी त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी ही भूमिका का सोडली, याचा नेमका खुलासा न करता त्यांनी सांगितलं की, “या प्रवासात अनेक चांगली माणसं जोडली गेली. लवकरच नव्या रुपात पुन्हा भेट होईल.”

Shiva Marathi Serial

प्रेक्षकांमध्ये काहीसा गोंधळ असतानाच, समीर पाटील यांचा हिंदी मालिकेत प्रवेश झाल्याची माहिती ही समोर आली आहे. शरद केळकर आणि निहारिका चौकसे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हिंदी  मालिकेत ‘तुम से तुम तक’ या आगामी शोमध्ये समीर झळकणार आहेत. या मालिकेत ते नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. सध्या या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर झळकला असून त्यातून त्यांच्या नव्या प्रवासाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.(Shiva Marathi Serial)

===============================

हे देखील वाचा: Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक केतकरनं व्यक्त केली कृतज्ञता !

===============================

मराठी मालिकांमधून हिंदी टेलिव्हिजनकडे वळणं हे अनेक कलाकारांसाठी मोठं पाऊल असतं. समीर पाटील यांचा हा निर्णय त्यांच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मराठी भाषेतील अभिनयात दम दाखवून आता ते हिंदी प्रेक्षकांच्या मनातही जागा मिळवतील,अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांनाही त्यांच्या या नव्या भूमिकेची उत्सुकता आहे. ‘शिवा’मध्ये रामभाऊ म्हणून त्यांनी उभा केलेला भावनिक आणि थोडासा मिश्किल स्वभाव लक्षात ठेवत, ‘तुम से तुम तक’मध्ये ते कशा भूमिकेत दिसणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor samir patil Celebrity Entertainment Shalva Kinjawadekar shiva serial Srushti Bahekar tum se tum tak serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.