लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

War 2 : ‘मैं इन्सान नही, जंग का हथियार हू’; ‘वॉर २’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
अखेर पॉवर पॅक परफॉर्मन्स असणाऱ्या ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एन.टी.आर यांच्या ‘वॉर २’ (War 2 movie) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला…. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या वॉर २ चित्रपटातून ज्यु. एन.टी.आर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे… शिवाय या चित्रपटात कियारा अडवाणी तिचा ग्लॅमरस अंदाज दाखवणार आहेच… नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘वॉर २’चा ट्रेलर रिलीज झाला असून एकदा ट्रेलर पाहून नक्कीच तुमचं मन भरणार नाही. ट्विस्ट अँड टर्न्सनी भरलेया या ट्रेलरमध्ये नक्की आहे तरी काय जाणून घेऊयात… (Bollywood News)

तर, ‘वॉर २’च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं की, हृतिक आणि ज्यु, एनटीआर दोघांनीही भारतीय सैनिकाची भूमिका यात साकारली आहे…भारतीय सैनिक असूनही ते एकमेकांचा सूड घेत आहेत असं दिसतं… पुढे असंही दिसतं की, हृतिक त्याच्याच बॉसला अर्थात आशुतोष राणाला डांबून ठेवतो. त्यामुळे आशुतोषच्या मनात ह्रतिकबद्दल राग असतो. ट्रेलरच्या शेवटी हृतिक आणि ज्यु. एनटीआर दोघेही आमनेसामने येतात. दोघांमध्ये भयंकर मारामारी आणि अॅक्शन सीन्स दिसत असून आता नेमकं दोघांमध्ये वैर का आहे हे चित्रपटातूनच उलगडणार आहे… विशेष म्हणजे या चित्रपटात कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने देखील भारतीय सैनिकाची भूमिका साकारली आहे…
================================
हे देखील वाचा: War 2 : दमदार अॅक्शन आणि कसदार अभिनय; ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाचा टीझर रिलीज
=================================
दरम्यान, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील ‘वॉर २’ हा महत्वाचा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने ज्यु. एनटीआर आणि हृतिक रोशन दोघेही त्यांच्या करिअरची पंचवीशी साजरी करत आहेत… या चित्रपटात ह्रतिक रोशन, ज्युनिअर एन.टी.आर, कियारा अडवाणी, आशुतोष राणा असे बरेच कलाकार झळकणार आहेत… ‘वॉर २’ चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (War 2 movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi